Join us

अजित आगरकर टीम इंडियाचा नवा चीफ सिलेक्टर; ५ महिन्यांपासून पद होते रिक्त

भारतीय संघाचा माजी स्टार गोलंदाज अजित आगरकर टीम इंडियाचा नवा मुख्य निवडकर्ता झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 22:08 IST

Open in App

भारतीय क्रिकेट बोर्डाने(BCCI) मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून होती. तसे पाहता या पदासाठी भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरचे नाव पुढे होते. ४५ वर्षीय आगरकरने २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे ५८, २८८ आणि तीन विकेट्स घेतल्या.

यापूर्वी चेतन शर्मा हे मुख्य निवडक म्हणून काम करत होते, मात्र वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर त्यांना टीम इंडियाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून शिवसुंदर दास प्रभारी मुख्य निवडकर्त्याची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत अन्य तीन सदस्यांचाही समावेश आहे. आगरकर मुख्य निवडक बनल्यास ५ निवड समितीमध्ये पश्चिम विभागातून दोन निवडक असतील, तर उत्तर विभागातून एकही सदस्य नसेल.

टॅग्स :ऑफ द फिल्डबीसीसीआय
Open in App