Join us  

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटमधून 'SHORT' ब्रेक; १८ महिन्यानंतर टीम इंडियात केलेले पुनरागमन 

चेन्नई सुपर किंग्सनकडून आयपीएल २०२३ मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) भारतीय संघात पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 2:02 AM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सनकडून आयपीएल २०२३ मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करताना अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) भारतीय संघात पुनरागमन केले. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर उप कर्णधार अजिंक्यला बाकावर बसवले गेले होते. त्यानंतर त्याने रणजी करंडकात चांगली कामगिरी केली, आयपीएल २०२३ गाजवली. त्यामुळे त्याला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमनाची संधी मिळाली. भारताने तो सामना गमावला, परंतु अजिंक्यने ८६ व ४६ धावांची खेळी करून किल्ला लढवला होता. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला ( ३ व ८ धावा) अपयश आले. विंडीज दौऱ्यानंतर अजिंक्य कौंटी क्रिकेटमध्ये लिसेस्टरशायरकडून खेळणार होता, परंतु त्याने क्रिकेटमधून शॉर्ट ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.

अजिंक्य लिसेस्टरशायरकडून पुढील महिन्यात वन डे कप स्पर्धेत खेळणे अपेक्षित होता, परंतु त्याने माघार घेतली आहे. भारतीय संघाची पुढील २ सामन्यांची कसोटी मालिका डिसेंबर-जानेवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर होणार आहे. तोपर्यंत अजिंक्यकडे खेळण्यासाठी स्पर्धा नाही आहे. तरीही अजिंक्यने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अजिंक्यच्या जागी पीटर हँड्सकोम्ब लिसेस्टरशायर क्लबसोबत कायम राहणार आहे, त्याने या क्लबकडून कौंटी अजिंक्यपद व ट्वेंटी-२० ब्लास्टमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. लिसेस्टरशायरने त्यांच्या निवेदनात म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा वाढता व्याप पाहता अजिंक्यने ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अजिंक्यची बाजू समजू शकतो. मागील काही महिन्यांत तो भारतात आणि राष्ट्रीय संघासोबत प्रवास करतोय व सातत्याने क्रिकेट खेळतोय. अशा परिस्थितीत विश्रांती घेण्याचा आणि कुटुंबाला वेळ देण्याचा त्याचा निर्णय आम्ही समजू शकतो.    

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघकौंटी चॅम्पियनशिप
Open in App