Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियातील यशामागे राहुल द्रविडचं खरंच योगदान आहे का?; अजिंक्य रहाणेनं सांगितलं सत्य

माजी फलंदाज द्रविडनंही हे यश खेळाडूंचेच असल्याचे मत व्यक्त केले. पण, अजिंक्यनं यामागचं सत्य सांगितलं.

By स्वदेश घाणेकर | Updated: February 1, 2021 15:41 IST

Open in App

काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना टीम इंडियानं चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. प्रमुख खेळाडू जायबंदी होऊन माघारी परतले असताना युवा खेळाडूंना सोबत घेऊन अजिंक्यनं ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. या यशानंतर अजिंक्यसह मोहम्मद सिराज, शुबमन गिल, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, नवदीप सैनी या युवा खेळाडूंचं कौतुक होतच आहे. शिवाय भारताच्या ऐतिहासिक कामगिरीमागे दी वॉल राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचाही मोठा वाटा आहे, अशी चर्चा रंगली आहे. माजी फलंदाज द्रविडनंही हे यश खेळाडूंचेच असल्याचे मत व्यक्त केले. पण, अजिंक्यनं यामागचं सत्य सांगितलं.

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे यानेही ऑस्ट्रेलियातील यशाचं श्रेय माजी कर्णधार व सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा ( NCA) प्रमुख राहुल द्रविड याला दिले. राहुल द्रविडने  भारत अ आणि १९ वर्षांखालील संघांना मार्गदर्शन केले आहे आणि त्या संघांतील खेळाडूंनी हा ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला. Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

अजिंक्य म्हणाला,'' या यशामागे राहुल भाई यांची खूप मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनपूर्वी आम्ही NCAत जायचो आणि तिथे राहुल द्रविड असल्यास आम्हाला दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. राहुल भाई १९ वर्षांखालील आणि भारत अ संघाचा मुख्य प्रशिक्षक होते आणि आता ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत. त्यांनी मोहम्मद सिराज व नवदीप सैनी यांना मदत केली. शुबमन गिल व मयांक अग्रवालही तेथेच होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी त्यांनी भारत अ सोबत अनेक दौरे केले, स्थानिक क्रिकेटमध्येही धावा केल्या. राहुल भाई आणि आम्ही फोनवर बोललो, एकमेकांशी चर्चा केली. मेलबर्न कसोटीनंतर राहुल भाईनं मला मॅसेज केला आणि ब्रिस्बेन सामन्यानंतर लगेचच संघाचा किती अभिमान वाटतोय हे त्यानं सांगितले.''  Vamika Meaning: ... म्हणून विराट-अनुष्का यांनी कन्येचं नाव 'वामिका' असं ठेवलं!

द्रविडने नेमके काय केले? - आधुनिक तंत्रज्ञान आधारित सराव आणि फिटनेसवर भर दिला. १९ वर्षांखालील प्रत्येक झोनमधील खेळाडूंच्या कामगिरीचा साप्ताहिक प्रगती अहवाल तयार केला. ‘अ’ संघासाठी करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंचा पूल ३० पर्यंत नेला. भारत ‘अ’ संघाचा विदेश दौरा वर्षातून दोनदा होईल, याची सोय केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा सुधारला. IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!

खेळाडू शोधले, जडणघडणही केली - खेळाडूंमधील कौशल्य विकास, तंत्र आणि शारीरिक फिटनेस सुधारणे या मुद्यांवर भर देण्यात आला. एखादा खेळाडू सरावादरम्यान आठवड्यात किती फटके खेळला. किती चुका झाल्या आदींचा लेखाजोखा द्रविडने ठेवला. त्या खेळाडूच्या चुका सुधारल्या. खेळाडू सामन्यादरम्यान कसा वागतो, याचाही शोध घेत पुढे त्या खेळाडूला अ संघातून खेळविण्याचा प्रयोग केला. मोहम्मद सिराज आणि मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना काही वेळा ‘अ’ संघात न खेळवता स्थानिक क्रिकेटचा अनुभव घेण्यास वाव दिला.

टॅग्स :अजिंक्य रहाणेराहूल द्रविडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया