Join us  

प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची; Ajinkya Rahane बंद स्टेडियममध्ये IPL खेळण्यास तयार 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 1:57 PM

Open in App

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला. सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आयपीएल आता अनिश्चित काळासाठी रद्द केली गेली आहे. आयपीएल न झाल्यास खेळाडूंसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय),  फ्रँचायझी, ब्रॉडकास्टर्स यांना मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल खेळवण्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यात आयपीएल प्रेक्षकांविना हा एक पर्यायही आहे. या पर्यायाला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणेनं पाठिंबा दर्शविला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आयोजित केलेल्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये रहाणे म्हणाला,''आयुष्यात अनपेक्षित काहीही होऊ शकतं हे कोरोना व्हायरसनं आपल्याला शिकवलं. त्यामुळे आपण जे काय करतो त्यात समाधानी रहायला हवं आणि जे आहे त्यात आनंदी रहायला हवं. आयपीएल किंवा अन्य खेळांबद्दल विचारत असाल, तर ते प्रेक्षकांविना खेळवायला हरकत नाही. स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्याला प्रेक्षकांविना खेळण्याची सवय आहेच.''

रहाणे पुढे म्हणाला,''चाहत्यांशिवाय आमचं अस्तित्व नाही आणि त्यामुळेच त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यांना घरी बसून लाईव्ह क्रिकेट पाहायला मिळालं तरी ते आनंदी होतील. प्रेक्षकांची सेफ्टी महत्त्वाची आहे आणि त्यासाठी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळावे लागले, तरी आम्ही तयार आहोत.'' 

फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम! 

रोहित शर्माला बनायचं होतं गोलंदाज; आज जग त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं 

रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज

त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली

रोहित शर्माला 'हिटमॅन' हे नाव कुणी दिलं? पाहा Video

टॅग्स :अजिंक्य रहाणेआयपीएल 2020कोरोना वायरस बातम्या