Join us

अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप

येथे सुरू असलेल्या कर्नाटक विरुद्ध रणजी सामन्यात मुंबईचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 05:56 IST

Open in App

मुंबई : येथे सुरू असलेल्या कर्नाटक विरुद्ध रणजी सामन्यात मुंबईचा स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. अजिंक्यला फक्त एकच धाव काढता आली. मुंबईच्या दुसºया डावात पाच बाद १०९ धावा झाल्या आहेत.मुंबईच्या शशांक अतार्डे याने घेतलेल्या पाच बळींनंतरही कर्नाटकने पहिल्या डावात २१८ धावा करत मुंबईवर २४ धावांची आघाडी घेतली.त्यानंतर अभिमन्यू मिथून याने तीन बळी घेत मुंबईची आघाडीची बळी तंबूत पाठवली. त्यानंतर सर्फराज खान (नाबाद ५३) व शम्स मुलानी (३१) यांनी मुंबईचा डाव सावरला. मुंबईला ८५ धावांची आघाडी मिळाली आहे.दुसºया सामन्यात तमिळनाडूने उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात सहा बाद १६५ धावा केल्या आहेत. एल. सूर्यप्रकाशने ५१, तर गंगा श्रीधरने ४५ धावा केल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. बडोदा येथे ब गटातील सामन्यात बडोदाने रेल्वेसमोर जिंकण्यासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले.