Join us

अजिंक्य रहाणेला वाटले शतक झाले, पण रैनाने सांगितली वेगळीच गोष्ट; पाहा हा मजेशीर व्हिडीओ

स्थानिक फलकावर त्याच्या नावावर शंबर धावा लावण्यात आल्या. ते अजिंक्यने पाहिले. त्यामुळे त्याने शतक झळकावल्याचा आनंद साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 16:43 IST

Open in App

नवी दिल्ली : शतक झाल्यावर सर्वच फलंदाज आपली बॅट उंचावतात. तसे अजिंक्य रहाणेनेही एका सामन्यात केले. पण त्यानंतर एक भन्नाट मजेशीर किस्सा घडला आणि अखेर योग्य गोष्टीचा उलगडा झाला.

हा किस्सा घडला तो देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत. भारतीय क संघाकडून अजिंक्य फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने एकेरी धाव घेतली आणि तेथील स्थानिक फलकावर त्याच्या नावावर शंबर धावा लावण्यात आल्या. ते अजिंक्यने पाहिले. त्यामुळे त्याने शतक झळकावल्याचा आनंद साजरा केला. त्याच्या संघातील खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. पण मुख्य गोष्ट त्या पुढे घडली.

हा पाहा मजेशीर व्हिडीओ

स्थानिक धावफलकावर जरी शंभर धावा अजिंक्यच्या नावावर लावण्यात आल्या असल्या तरी ते चुकीने झाले होते. कारण त्यावेळी टिव्हीवर दाखवत असलेल्या डिजीटल स्कोअरबोर्डवर मात्र अजिक्यच्या 97 धावा झाल्याचे दिसत होते आणि तेच बरोबर होते. अजिंक्यने बॅट उंचावल्यावर काही वेळाने सुरेश रैनाने अजिंक्यला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :अजिंक्य रहाणेसुरेश रैना