अजिंक्य रहाणेच्या 'नन्ही परी'चं बारसं; जाणून घ्या काय नाव ठेवलं!

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना त्याच्या घरी गोड बातमी आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:06 IST2019-11-07T15:05:48+5:302019-11-07T15:06:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ajinkya Rahane daughter naming ceremony done in mumbai; Know her name | अजिंक्य रहाणेच्या 'नन्ही परी'चं बारसं; जाणून घ्या काय नाव ठेवलं!

अजिंक्य रहाणेच्या 'नन्ही परी'चं बारसं; जाणून घ्या काय नाव ठेवलं!

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना त्याच्या घरी गोड बातमी आली होती. रहाणेला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. त्यामुळे विशाखापट्टणम कसोटी संपल्यानंतर रहाणे तातडीनं मुंबईत कन्येची भेट घायला आला. त्यानंतर तो पुण्यातील कसोटीसाठी रवाना झाला. आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळत आहे. रहाणे हा कसोटी संघाचा सदस्य असल्यानं त्याच्याकडे आता निवांत वेळ आहे आणि तो संपूर्ण वेळ आपल्या कन्येसोबत घालवत आहे.

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने ट्विटरद्वारे अजिंक्य बाप झाल्याची माहिती दिली होती. भज्जीनं ट्विट करून अजिंक्य रहाणे बापमाणूस झाल्याची गोड बातमी सर्वांना दिली. अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.

रहाणेनं आतापर्यंत तिच्या मुलाची पाठमोराच फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, गुरुवारी राधिकानं त्यांच्या गोड कन्येचा चेहरा दाखवला. त्याला कारणही तसंच होतं. अजिंक्य आणि राधिका यांच्या कन्येचा नामकरण सोहळा. या दोघांनी त्यांच्या कन्येचं नाव आर्या असं ठेवलं आणि याची माहिती राधिकानं इस्टाग्रामवर पोस्ट करून दिली.



Web Title: Ajinkya Rahane daughter naming ceremony done in mumbai; Know her name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.