अजिंक्य रहाणेचे बालपणीचे क्रिकेट कोच विद्याधर पराडकर यांचे निधन

मुंबईत ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 09:03 IST2023-09-04T08:59:52+5:302023-09-04T09:03:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ajinkya Rahane childhood cricket coach Vidyadhar Paradkar passes away | अजिंक्य रहाणेचे बालपणीचे क्रिकेट कोच विद्याधर पराडकर यांचे निधन

अजिंक्य रहाणेचे बालपणीचे क्रिकेट कोच विद्याधर पराडकर यांचे निधन

Ajinkya Rahane coach passes away: भारतीय क्रिकेटला अजिंक्य रहाणे आणि झहीर खानसारखे प्रतिभावान खेळाडू देणारे प्रशिक्षक विद्याधर पराडकर यांचे निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळ आजारी होते. पराडकरांची प्राणज्योत ७६ वर्षी मालवली. क्रिकेटपटूंमध्ये विद्या सर म्हणून ते प्रसिद्ध होते. अजिंक्य रहाणेने वयाच्या १६ व्या वर्षी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. टीम इंडियात निवड झाल्यानंतरही तो विद्या सरांची सतत भेट घेत असे. 2019 मधील एका कार्यक्रमात रहाणेने, पराडकर यांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल माहिती दिली होती.

अजिंक्य रहाणेने वाहिली श्रद्धांजली

आपल्या गुरूच्या निधनाने दु:खी झालेल्या रहाणेने सोशल मीडियावर श्रद्धांजली पोस्ट केली. 'माझे बालपणीचे प्रशिक्षक श्री विद्या पराडकर यांचे निधन झाले आहे. हे कळवताना दुःख होत आहे. एक व्यक्ती आणि क्रिकेटर म्हणून मला घडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. माझ्या सहवेदना आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ओम शांति,' असे रहाणेने ट्विट केले.

सचिनची बॅट अजिंक्यला दिली

भारतीय कसोटी उपकर्णधार रहाणेने एकदा एक मजेदार किस्सा शेअर केला. तेव्हा विद्या सरांनी सचिन तेंडुलकरने त्यांनी दिलेली बॅट अजिंक्यला दिली होती. या घटनेबाबत रहाणे म्हणतो की, मी मुंबईसाठी अंडर-15 आणि अंडर-17 स्तरावर खेळलो आणि धावा केल्या, मग एके दिवशी त्यांनी मला सांगितले की ती बॅट सचिन तेंडुलकरने त्यांना भेट दिली होती. त्या बॅटने त्यांना आणि मग मला खेळाचा आदर करायला शिकवले.

Web Title: Ajinkya Rahane childhood cricket coach Vidyadhar Paradkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.