अजिंक्य रहाणेनं परफेक्ट शॉट मारला; पण कॅप्टननं जबरदस्त 'फ्लाइंग कॅच'सह त्याला दाखवला तंबूचा रस्ता

दुसऱ्यांदा त्याच गोलंदाजानं अजिंक्यला दाखवला तंबूचा रस्ता, पण यावेळी मुंबईकर कॅप्टनच्या विकेटचं सर्व श्रेय जम्मूच्या कॅप्टनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:36 IST2025-01-24T15:13:04+5:302025-01-24T15:36:51+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya played a perfect shot; but the innings collapsed due to a stunning 'flying catch' | अजिंक्य रहाणेनं परफेक्ट शॉट मारला; पण कॅप्टननं जबरदस्त 'फ्लाइंग कॅच'सह त्याला दाखवला तंबूचा रस्ता

अजिंक्य रहाणेनं परफेक्ट शॉट मारला; पण कॅप्टननं जबरदस्त 'फ्लाइंग कॅच'सह त्याला दाखवला तंबूचा रस्ता

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Paras Dogra Sensational One Handed Catch To Dismiss Ajinkya Rahane : रणजी करंडक स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील लढत रंगली आहे. या सामन्यातील दोन्ही डावात मुंबईच्या ताफ्यातील स्टार फलंदाजांनी निराशजनक कामगिरी केली. यात टीम इंडियातील उगवता तारा यशस्वी जैस्वाल अन् मावळता तारा रोहित शर्मासह श्रेयस अय्यर आणि कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या फ्लॉप शोचा सावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दोन्ही  डावात एकाच गोलंदाजानं अजिंक्यला दाखवला तंबूचा रस्ता

दोन्ही डावात मुंबईच्या आघाडीच्या फळतील एकालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावात १२ धावांवर तंबूत परतलेला अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात १६ धावा करून बाद झाला. मुंबई संघाचे नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेला दोन्ही डावात उमर नाझीर या अनकॅप्ड गोलंदाजाने तंबूचा रस्ता दाखवला.  

पहिल्यावेळी बोल्ड, दुसऱ्या डावात अप्रतिम झेलसह खेळ झाला खल्लास

पहिल्या डावात अजिंक्य रहाणे हा उमर नाझीर याच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला होता. दुसऱ्या डावात आघाडीच्या विकेट्स पडल्यावर अजिंक्य राहणे लयीत दिसला. तो डाव सावरणार असे वाटत होते. पण जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा याने क्षेत्ररक्षणाचा कमालीचा नजराणा पेश करत मुंबईकर कॅप्टनचा खेळ खल्लास केला. अजिंक्य रहाणेनं एकदम परफेक्ट फटका मारला होता. पण पारसनं हवेत झेपावत एका हातात जबरदस्त झेल घेत त्याचा फटका व्यर्थ ठरवला. अजिंक्य रहाणेच्या रुपात उमर नाझीरच्या खात्यात एक महत्त्वपूर्ण विकेट जमा झाली.

पुन्हा शार्दुल ठाकूरनं आपल्यावर घेतली बॅटिंगसह डाव सावरण्याची जबाबदारी

एलिट ग्रुप ए मधील लढतीत स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईच्या संघाने पहिल्या डावात फक्त १२० धावा केल्या होत्या. जम्मू काश्मीरच्या संघानं  पहिल्या डावात २०६ धावा करत या सामन्यात ८६ धावांची अल्प आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पुन्हा मुंबई संघाच्या आघाडीच्या फलंदाजीत बिघाडीचा माहोल पाहायला मिळाला. परिणामी दुसऱ्या दिवसाच्या खेळात दुसऱ्या डावात मुंबई संघानं चहापानापर्यंत  १७४ धावांत ७ विकेट्स गमावल्या होत्या. तळाच्या फलंदाजीत पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरनं बॅटिंगची सूत्रे आपल्या हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावातील अर्धशतकी खेळीनंतर त्याच्या भात्यातून आणखी एक उपयुक्त खेळी पाहायला मिळाली. 

Web Title: Ajinkya played a perfect shot; but the innings collapsed due to a stunning 'flying catch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.