Join us  

'आयुष'मान टीम इंडिया; अर्जुनवर होत्या नजरा, पण 'या' तरुणाने पराक्रम केला!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनवर होत्या. मात्र या लढतीत अर्जुन नाही तर दुसराच खेळाडू चमकला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:27 PM

Open in App

कोलंबो - भारत आणि श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनवर होत्या. मात्र या लढतीत अर्जुन नाही तर दुसराच खेळाडू चमकला आहे. आयुष बदोनी असे या खेळाडूचे नाव असून त्याने चार विकेट्स घेतल्या, तर दुस-या डावात त्याने नाबाद 185 धावांची तुफान खेळी केली. चार दिवसीय कसोटी सामन्यात आयुषच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव 244 धावांवर गुंडाळला. आयुषला हर्ष त्यागीने चार विकेट घेऊन तोलामोलाची साथ दिली. याशिवाय अर्जुन आणि मोहित जांगरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  गोलंदाजीत प्रभाव पाडल्यानंतर आयुषने फलंदाजीत तडाखेबाज खेळी केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आयुषने नाबाद 185 धावा करताना संघाला मजबुत स्थितीत आणले. त्याने 205 चेंडूंत 19 चौकार आणि 4 षटकार लगावत ही खेळी साकारली. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 244 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने 589 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यात आयुषच्या नाबाद 185, तर अथर्व तायडेच्या 113 धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे. भारताने 345 धावांची आघाडी घेतली आहे.    

टॅग्स :भारतक्रिकेटक्रीडा