Join us

तब्बल दोन वर्षांनी वेगाचा अनभिषिक्त सम्राट मैदानात उतरणार

दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. त्यामुळे या दुखापतीतून सावरून आज तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 17:12 IST

Open in App
ठळक मुद्दे2016 ऑक्टोबरमध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

नवी दिल्ली : वेग हे ज्याचे दुसरे नाव समजले जाते, असा एकच वेगवान गोलंदाज सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये आहे. दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. त्यामुळे या दुखापतीतून सावरून आज तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये बुधवारी एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने तब्बल दोन वर्षांनी पुनरागमन केले आहे. यापूर्वी 2016 ऑक्टोबरमध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी तो मैदानात उतरणार असल्यामुळे त्याच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :द. आफ्रिका