Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल दोन महिन्यांनंतर धोनी घरी परतला; वाट पाहत होती 'ही' खास गाडी

सध्याच्या घडीला धोनी भारतीय संघात नाही. यापुढे धोनीला भारतीय संघात स्थान मिळेल का, याबाबत संदिग्घता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 13:54 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा तब्बल दोन महिन्यांनी आज घरी परतल्याचे पाहायला मिळाले. धोनी सध्याच्या भारतीय संघात नाही, पण तरीही दोन महिने तो घराबाहेर होता. पण घरी परतल्यावर एका महागड्या गाडीत बसल्याचे पाहायला मिळाले आहे.

सध्याच्या घडीला धोनी भारतीय संघात नाही. यापुढे धोनीला भारतीय संघात स्थान मिळेल का, याबाबत संदिग्घता आहे. पण धोनी मात्र सध्याच्या घडीला फार बिझी असल्याचे दिसत आहे. विश्वचषकानंतर धोनी भारताच्या आर्मीबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये सराव करायला गेला होता. त्यानंतर धोनीने काही जाहीरातींचे शूट केले होते. जाहिरातींनंतर धोनी थेट अमेरिकेला गेला. त्यामुळे तब्बल दोन महिने धोनी घरी गेला नव्हता.

दोन महिन्यांनंतर धोनी घरी गेल्यावर त्याचे कुटुंबिय तर वाट पाहत होतेच. पण एक खास गाडी त्याची वाट पाहत होती. धोनीने काही दिवसांपूर्वी एक गाडी बूक केली होती. धोनीच बाईक्स आणि कारवरील प्रेम हे जगजाहीर आहे. त्यामुळे ही नवीन जीप धोनीच्या घरी दाखल झाली, त्यावेळी साक्षीला माहीची आठवण आली. तिनं या नवीन सदस्याचे स्वागत केले आणि missing you माही अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. धोनीच्या ताफ्यात दाखल झालेल्या या जीपची किंमत ही जवळपास 79 लाख इतकी आहे. त्यामुळे आज घरी गेल्यावर माहिने या गाडीतून सैर केल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी