IPL 2023: 'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत

IPL 2023: मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर नवीन उल हकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 01:37 PM2023-05-25T13:37:46+5:302023-05-25T14:09:33+5:30

whatsapp join usJoin us
After the match against Mumbai, Naveen Ul Haq has posted a post through his Instagram account. | IPL 2023: 'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत

IPL 2023: 'मला खूप काही सांगायचे आहे, पण...'; कोहलीला नडणाऱ्या नवीन उल हकची पोस्ट पुन्हा चर्चेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

संपूर्ण स्पर्धेत कमजोर गोलंदाजी म्हणून गणल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज आकाश मढवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपरजायंट्सला ८१ धावांनी नमवत दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेश केला. 

लखनौकडून नवीन उल हकने चांगली गोलंदाजी केली. नवीन-उल-हकने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएल २०२३ मधील एलिमिनेटर सामन्यात केवळ ३८ धावांत चार विकेट घेतल्या. त्याने मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज तंबूत माघारी धाडले. नवीनने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव कॅमेरॉन ग्रीन आणि तिलक वर्मा यांच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर नवीन उल हकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट केली आहे. मला खूप काही सांगायचे आहे. पण आत्ता मी एवढेच म्हणेन की प्रशिक्षक, व्यवस्थापन आणि या प्रवासात सहभागी असलेल्या सर्वांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असं नवीन उल हकने म्हटलं आहे. नवीन उल हकच्या या पोस्टची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयपीएल २०२३ मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु बाहेर गेल्यावर नवीन-उल-हकने कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आरसीबीच्या पराभवानंतर 'गोड आंबे...' अशी स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. नवीनने कोहलीला डिवचण्यासाठी सोशल मीडियावर अनेक स्टोरी आणि पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर आता लखनौही आयपीएल २०२३ मधून बाहेर गेल्यावर आरसीबीचे चाहते नवीनला ट्रोल करताना दिसत आहे.

Web Title: After the match against Mumbai, Naveen Ul Haq has posted a post through his Instagram account.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.