प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर

पंजाब किंग्जने मुंबईचा पराभव केल्यानंतर अभिनेता सलमान खानच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:28 IST2025-06-02T13:25:11+5:302025-06-02T13:28:06+5:30

whatsapp join usJoin us
After Punjab Kings defeated Mumbai actor Salman Khan has answered a question from 11 years ago | प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर

प्रीती झिंटाची टीम जिंकली का? मुंबईला पराभूत केल्यानतंर पंजाब किंग्जने सलमान खानला दिलं प्रत्युत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PBKS vs MI: पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पाच विकेट्सने पराभव करून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये नवीन विजेता मिळणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाचा अंतिम फेरीत पोहोचवलं. आता ३ जून रोजी अंतिम फेरीत पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलप्रेमींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच अभिनेता सलमान खानची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर पंजाब किंग्जने प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईच्या धोकादायक गोलंदाजीसमोर विजयासाठी पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. मात्र कर्णधार श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत विजय खेचून आणला. श्रेयसने आठ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या. श्रेयसने १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर अभिनेता सलमान खानचे ११ वर्षांपूर्वीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. पंजाब किंग्जने तिच पोस्ट रिपोस्ट करत सलमान खानला उत्तर दिलं आहे.

 २८ मे २०१४ रोजी केलेल्या या पोस्टमध्ये सलमान खानने 'झिंटाची टीम जिंकली का?' असं विचारलं होतं. मुंबईचा पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाब किंग्जने सलमान खानला प्रत्युत्तर दिलं आहे. सलमान खानच्या चित्रपटातील एक फोटो पोस्ट करत पंजाब किंग्जने फायनलमध्ये भेटू भाई असं म्हटलं आहे.

यापूर्वी २६ मे रोजी आयपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ७ गडी राखून पराभव केला होता. त्यावेळी देखील पंजाब किंग्जच्या विजयानंतर सलमान खानची ११ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावेळी सलमानच्या याच प्रश्नावर पंजाबने उत्तर दिलं होतं. भाई, वरून पॉइंट्स टेबल तपास, असं म्हणत पंजाबने सनग्लासेस घालून सलमानचा एक फोटो देखील पोस्ट केला होता.
 

Web Title: After Punjab Kings defeated Mumbai actor Salman Khan has answered a question from 11 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.