Join us

...अन् महाविजयानंतर 'बापमाणूस' धोनी रुजू झाला लाडक्या लेकीच्या सेवेत 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या महासंग्रामात कर्णधाराची जबाबदारी चोख बजावल्यानंतर, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी लगेचच 'बाबा'च्या भूमिकेत शिरला आणि त्यानं लाडक्या लेकीच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 17:46 IST

Open in App

नवी दिल्लीः रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या महासंग्रामात कर्णधाराची जबाबदारी चोख बजावल्यानंतर, 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी लगेचच 'बाबा'च्या भूमिकेत शिरला आणि त्यानं लाडक्या लेकीच्या - झिवाच्या मेक-अपचं 'फिनिशिंग'ही तितक्याच सहजपणे पूर्ण केलं. झिवाचे केस ड्रायरने कोरडे करत असल्याचा व्हिडीओ धोनीने इन्टाग्रामवरून शेअर केला आहे. तो काही मिनिटांतंच लाखो चाहत्यांनी, फॉलोअर्सनी पाहिलाय, लाइक केलाय. 

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर काल रात्री धोनी वादळ घोंघावलं. रॉयल चॅलेंजर्सनं दिलेलं २०६ धावांचं आव्हान पार करून चेन्नईच्या सुपरकिंग्जनी पराक्रम रचला. अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनीनं चौकार, षटकारांची आतषबाजी करत चेन्नईला विजयपथावर नेलं. धोनीनं नाबाद ७० धावांची खेळी करत विजयी षटकार ठोकला. त्याच्या या खेळीचं प्रचंड कौतुक होतंय.

त्यानंतर, आज सकाळी धोनीनं झिवासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'सामना संपला, मस्त झोप झाली आणि आता पुन्हा बाबाच्या ड्युटीवर...', अशी कॅप्शन त्यानं दिलीय. त्यावर चाहत्यांनी या 'बापमाणसा'ला सलाम केलाय.

टॅग्स :आयपीएल 2018एम. एस. धोनी