Join us

लग्नानंतरही 'या' क्रिकेटपटूची झाली सात अफेअर्स, बायकोसमोर केला खुलासा

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात क्रिकेटपटू आणि त्याच्या बायकोला यांना आमंत्रित करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 21:33 IST

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटपटू विविध दौऱ्यांसाठी बऱ्याच देशांमध्ये फिरत असतात. प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर पत्नी असतेच असे नाही. काही वेळा क्रिकेटपटू मोठ्या पार्ट्यांमध्ये जातात. त्यावेळी त्यांची सुंदरींबरोबर अफेअर्स होतात, असे म्हटले जाते. एका क्रिकेटपटूने तर आपले लग्नानंतरही सात अफेअर्स झाले असे म्हणत सर्वांनाच धक्का बसला. सर्वात मोठा धक्का तर तेव्हा बसला, जेव्हा त्याने आपल्या बायकोसमोरच या अफेअर्सचा उलगडा केला. आता हा क्रिकेटपटू नेमका कोण, हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात क्रिकेटपटू आणि त्याच्या बायकोला यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अँकरने एक प्रश्न या क्रिकेटपटूला विचारला. त्यावर काहीही न लपवता, माझे लग्नानंतरही सात अफेअर्स झाली, असे त्या क्रिकेटपटूने सांगितले. त्याचबरोबर ही अफेअर्स दोन्ही बाजूने झाली, ती एकतर्फी नव्हता. त्याचबरोबर प्रत्येक अफेअरची ठरलेली मदत होती, असेही त्या क्रिकेपटूने सांगितले आहे.

हा क्रिकेटपटू नेमका कोण, ही उत्सुकता आता ताणली गेली असेल. तर हा क्रिकेटपटू सध्या खेळत नाही. पण आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्याने संघाला काही विजय मिळवून दिले होते. हा क्रिकेटपटू म्हणजे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दूल रझाक.

टॅग्स :पाकिस्तान