मुंबईः 2011च्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंग यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर करून टाकलं. पुढे तो म्हणाला, लहानपणापासूनच मी वडिलांचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत आणि खास करून 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळानं कसं लढायचं, पडायचं आणि पुन्हा उठून कसं पुढे जायचं हे मला शिकवलं. यावेळी युवराजनं निवृत्तीसंदर्भात क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरशीही सल्ला-मसलत केल्याचं सांगितलं.सचिननं मला सांगितलं की, तुझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आणायची की नाही, याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हा निर्णय तुझ्याशिवाय कोणीही घेऊ शकत नाही. त्यानंतर मी हा निवृत्तीचा निर्णय घेतल्याचंही युवराज सिंग म्हणाला. यापुढे मी कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मला जास्त टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, याची खंत आहे. त्यानंतर कोणत्या क्रिकेटपटूमध्ये तू स्वतःला पाहतोस हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. त्यात मला स्वतःची प्रतिमा दिसते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Yuvraj Singh's Retirement: निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!
Yuvraj Singh's Retirement: निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!
2011च्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंग यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 15:05 IST