Join us
Daily Top 2Weekly Top 5

हरमनप्रीतच्या समर्थनानंतर पोवार यांनी प्रशिक्षकपदासाठी केला अर्ज

महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून पोवार यांचा वादग्रस्त कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 04:05 IST

Open in App

मुंबई : टी२० कर्णधार हरमनप्रीत कौर व उपकर्णधार स्मृती मानधना यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून पोवार यांचा वादग्रस्त कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपला.४० वर्षीय पोवारने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘होय, मी संध्याकाळी महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. कारण स्मृती व हरमनप्रीत यांनी मला पाठिंबा दर्शविला. मी अर्ज न करुन त्यांना निराश करु इच्छित नाही.’