Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 18:52 IST

Open in App

मुंबई : 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या क्रिकेटपटूंच्या अश्लील वर्तनांमुळे चर्चेत आला होता. आता या दोघांनंतर भारताचा आर. अश्विन हा क्रिकेटपटू 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात दिसणार आहे. 

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनीही अश्विनला प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांवर अश्विनने नेमके काय म्हटले आहे, हे काही वेळातच सर्वांना समजू शकते.

कॉफी विथ करण कार्यक्रमाबाबत लोकेश राहुलने केली 'ही' कमेंटकॉफी विथ करण या कार्यक्रमात लोकेश राहुलने अश्लील वक्तव्य केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. भारतीय संघातून त्याची हकालपट्टीही करण्यात आली होती. आता या कार्यक्रमावर राहुलने एक कमेंट केली आहे. या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर आयुष्यात काय घडले आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल राहुलने आपले मत व्यक्त केले आहे.

राहुल म्हणाला की, " कॉफी विथ करण या कार्यक्रमानंतरचा काळ माझ्यासाठी फारच कठिण होता. प्रत्येक व्यक्तीला, खेळाडूला कठिण काळातून जावे लागते. पण यावेळी मी ठरवले होते की, आता फक्त आणि फक्त खेळावरच लक्ष केंद्रीत करायचे. प्रत्येक वेळी नेमके काय करायचे हे तुम्हाला ठरवता आले पाहिजे. " 

या कार्यक्रमानंतर तुझ्यामध्ये नेमका काय बदल झाला, असे विचारल्यावर राहुल म्हणाला की, " या घटनेनंतर मी फार नम्रपणे वागायला लागलो आहे. मला देशाकडून खेळायला मिळते हे माझे सौभाग्य आहे. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे." 

भरपूर संधी मिळूनही धावांचा पडलेला दुष्काळ, कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील वक्तव्य या साऱ्या गोष्टींमुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल निराशेच्या गर्तेत अडकला होता. पण यामधून त्याला भारताच्या एका महान फलंदाजाने बाहेर काढले. या महान फलंदाजाच्या टिप्समुळे राहुलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावा बरसल्या. या यशानंतर राहुलनेच आपल्याला एका दिग्गज खेळाडूने मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :आर अश्विनकॉफी विथ करण 6