चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. IPL 2020त साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागणाऱ्या CSKनं फिनिक्स भरारी घेत जेतेपदाचा मान पटकावला. त्यामुळे या विजयाचं सेलिब्रेशनही दणक्यात होणार हे निश्चित होतं. CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये रात्रभर जल्लोष झाला आणि शार्दूल ठाकूर हा सर्वाचा टार्गेट होता. त्यात DJ Bravo चं गाणं, यानं सेलिब्रेशनवर चार चाँद लावले..
प्रथम फलंदाजी करताना CSKनं ३ बाद १९२ धावा केल्या. फॅफ ड्यू प्लेसिसनं ५९ चेंडूंत ८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात KKRला ९ बाद १६५ धावा करता आल्या. शार्दूल ठाकूरनं ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजा व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर KKRचा डाव गडगडला.