Join us

धोनीला ट्वेन्टी-२० संघातून डच्चू दिल्याबद्दल अखेर कोहलीने सोडले मौन

गेल्या वर्षभरात धोनीला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. हे कारण पुढे करत निवड समितीने धोनीला डावलण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 13:20 IST

Open in App
ठळक मुद्देआता ट्वेन्टी-२०नंतर वनडे संघातून धोनीला डच्चू मिळणार का, अशी चर्चा सुरु आहे.

नवी दिल्ली : वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्या आली. या दोन्ही संघांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आले. त्यामुळे धोनीचे चाहते चांगलेच वैतागले होते आणि त्यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले होते. पण भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र याविषयावर काहीही बोलला नव्हता. पण अखेर याप्रकरणी कोहलीने आपेल मौन सोडले आहे.

गेल्या वर्षभरात धोनीला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करता आलेली नाही. हे कारण पुढे करत निवड समितीने धोनीला डावलण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर एकदिवसीय संघातही रिषभ पंतला स्थान देऊन त्यांनी धोनीसाठी स्पर्धा निर्माण केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता ट्वेन्टी-२०नंतर वनडे संघातून धोनीला डच्चू मिळणार का, अशी चर्चा सुरु आहे.

धोनीला वगळल्याबद्दल कोहली म्हणाला की, " ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी, असे आमचे मत आहे. धोनीला ट्वेन्टी-२० संघातून वगळण्यात आले असले तरी तो वनडे संघात कायम आहे. त्याच्या संघात असण्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. "

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी