क्वालांलपूर : इक्रम फैजी याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर तसेच मुजीब जदरान याने घेतलेल्या पाच गड्यांच्या जोरावर अफगाणिस्तानने आशिया चषक १९ वर्षांखालील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात एकतर्फी सामन्यात पाकिस्तानचा १८५ धावांनी पराभव केला.
पाकिस्ताननने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. अफगाण संघाने सात बाद २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ २२.१ षटकांत फक्त ६३ धावांवर बाद झाला. अफगाणच्या फैजी याने सलामीवीर रहमान गुल (४०) आणि इब्राहीम जरदार (३६) यांच्या साथीने चांगली सुरूवात करून दिली. संघाने ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या. पाकिस्तानकडून तीन गडी बाद करणारा मोहम्मद मुसा हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाची फलंदाजी मुजीब जदरान याने कापून काढली. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर मोहम्मद तहा (१९) व कर्णधार हसन खान (१०) हेच दुहेरी आकडा गाठु शकले. जदरान याने स्पर्धेत २० गडी बाद केले. त्याला मालीकावीरचा पुरस्कार देण्यात आला. तर अंतिम सामन्यात शतक झळकावणाºया फैजीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (वृत्तसंस्था)