अफगाण खेळाडूनं मन जिंकलं! 'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

'मेरे घर राम आये हैं हे गाणं अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनामुळे चांगलच गाजतंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:16 PM2024-01-25T13:16:20+5:302024-01-25T13:18:28+5:30

whatsapp join usJoin us
Afghanistan cricketer rahmanullah gurbaz share instagram story with mere ghar ram aaye hain song is viral on social media | अफगाण खेळाडूनं मन जिंकलं! 'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

अफगाण खेळाडूनं मन जिंकलं! 'मेरे घर राम आये हैं' गाण्यावर शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rahmanullah Gurbaz Story Viral : २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामसललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्याच दरम्यान अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलाय. 

अफगाणिस्तानचा फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज हा त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जातो. याआधीही त्याचा अहमदाबादमधील गरीब लोकांना पैसे वाटले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड व्हायरल झाला होता. नुकतीच स्टार फलंदाज रहमनुल्लाह गुरबाजने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. 

बॉलिवू़डचा सुप्रसिद्ध गायक जुबिन नौटियालच्या सुरेल अंदाजातील "मेरे घर राम आये हैं" या गाण्यावर रहमनुल्लाह गुरबाजने स्टोरी बनवली आहे. राम मंदिरतील रामललाच्या सोहळ्यानिमित्ताने या गाण्याला रामभक्तांची पसंती मिळाली. त्यावर आता रहमनुल्लाह गुरबाजची शेअर केलेली ही इंस्टाग्राम स्टोरी चाहत्यांना भलतीच आवडली असून ते या व्हायरल स्टोरीवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. 

गुरबाज व्यतिरिक्त,पाकिस्तानच्या दानिश कानेरियानेही रामललाचा फोटो पोस्ट करून जय श्री राम अशी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू केशव महाराज यांनीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर रहमानउल्ला गुरबाजची ही स्टोरी पाहून चाहते त्याच्यावर खूप खुश झाले आहेत. 

दरम्यान, या व्हायरल पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याच्या या पोस्टने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

Web Title: Afghanistan cricketer rahmanullah gurbaz share instagram story with mere ghar ram aaye hain song is viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.