Join us

अफगाणचा शहजाद निलंबित

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज अहमद शहजादला डोपिंगमध्ये अपयशी ठरल्यावर एक वर्षासाठी निलंबित केले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 02:38 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज अहमद शहजादला डोपिंगमध्ये अपयशी ठरल्यावर एक वर्षासाठी निलंबित केले आहे.आयसीसीने म्हटले की, ‘शहजाद याने अनवधनाने प्रतिबंधित पदार्थ हायड्रोक्सिकटचे सेवन केले होते. तो वजन कमी करण्यासाठी औषधे घेत होता. ’शहजाद याने आतापर्यंत ५८ एकदिवसीय आणि ५८ टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.हा २९ वर्षांचा क्रिकेटर आयसीसी डोपिंगविरोधी संहितेच्या अनुच्छेद २.१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.दुबईत १७ जानेवारी २०१७ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत शहजादच्या नमुन्यात क्लेनबुटेरोलचे सेवन केले होते. वाडाने हे औषध प्रतिबंधित केले आहे.आयसीसीने म्हटले की, ‘शहजादने आपली चूक मान्य केली आहे. त्याच्यावर १२ महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्याच्यावर १७ जानेवारी २०१७ पासून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो १७ जानेवारी २०१८ ला पुनरागमन करू शकतो.’

टॅग्स :क्रिकेटअफगाणिस्तान