Join us  

अ‍ॅडिलेड कसोटी दिवसाच, क्रिकेट आॅस्ट्रेलियाने दिला दुजोरा

भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुलाबी चेंडूने सामना खेळण्यास नकार दिल्याने, यंदा वर्षाअखेर भारताविरुद्ध अ‍ॅडिलेडमध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार नाही, असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) मंगळवारी स्पष्ट केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:06 AM

Open in App

मेलबोर्न : भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुलाबी चेंडूने सामना खेळण्यास नकार दिल्याने, यंदा वर्षाअखेर भारताविरुद्ध अ‍ॅडिलेडमध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळविण्यात येणार नाही, असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने (सीए) मंगळवारी स्पष्ट केले. सध्या आयसीसीच्या घटनेनुसार दिवस-रात्र कसोटीच्या आयोजनासाठी पाहुण्या बोर्डाची सहमती असणे आवश्यक आहे.बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी ‘सीए’ला पत्र लिहून भारत सध्या गुलाबी चेंडूने सामना खेळण्यास तयार नसून अ‍ॅडिलेड कसोटी परंपरागत लाल चेंडूने खेळण्यास प्राधान्य राहील, असे कळवले होते. ‘सीए’चा प्रवक्ता म्हणाला,‘भारतीय बोर्ड अ‍ॅडिलेडमध्ये प्रस्तावित दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास तयार नाही, याला आम्ही दुजोरा देतो. आम्ही डिसेंबरमध्ये भारताचे यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज आहोत.’प्रवक्ता पुढे म्हणाला, ‘आम्ही कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी किमान एक ‘दिवस -रात्र’ कसोटी सामना खेळविण्यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही श्रीलंकेविरुद्ध जानेवारी महिन्यात गाबामध्ये दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या आयोजनासाठी उत्सुक आहोत.’ आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत मायदेशात चार दिवस-रात्र कसोटी सामने खेळले असून त्या सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी पहिली लढत न्यूझीलंडविरुद्ध २०१५ मध्ये अ‍ॅडिलेडमध्ये खेळली होती.

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ