माझ्यावरील चित्रपटामध्ये ' या ' अभिनेत्याने काम करावं - द्रविड

सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या क्रिकेपटूंवरही सिनेमा आला होता. आता माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर सिनेमा येऊ शकतो, असे बोलले जात आहे. याबाबत काही प्रश्न दस्तुरखुद्द द्रविडलाच विचारले गेले. आपली भूमिका कोणत्या अभिनेत्याने केली, हे द्रविडने यावेळी सांगितलेही आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:57 IST2018-07-25T18:53:31+5:302018-07-25T18:57:18+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
The actor should work on my biopic - Dravid | माझ्यावरील चित्रपटामध्ये ' या ' अभिनेत्याने काम करावं - द्रविड

माझ्यावरील चित्रपटामध्ये ' या ' अभिनेत्याने काम करावं - द्रविड

ठळक मुद्देतुझी भूमिका कोणत्या अभिनेत्याने करावी, असा प्रश्न द्रविडला विचारला गेला.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यावर चित्रपट बनवला जात आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या क्रिकेपटूंवरही सिनेमा आला होता. आता माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडवर सिनेमा येऊ शकतो, असे बोलले जात आहे. याबाबत काही प्रश्न दस्तुरखुद्द द्रविडलाच विचारले गेले. आपली भूमिका कोणत्या अभिनेत्याने केली, हे द्रविडने यावेळी सांगितलेही आहे.

एक खेळाडू म्हणून द्रविड हा महान होता. पण निवृत्तीनंतर त्याने भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारले आणि देशाला विश्वचषक जिंकवून देण्यात द्रविडने मोलाचा वाटा उचलला होता. द्रविडचे मार्गदर्शन आणि पृथ्वी शॉ याच्या नेतृत्त्वाखाली भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती.

द्रविडचा आतापर्यंतचा प्रवास हा बऱ्याच जणांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यामुळे त्याच्यावर एक सिनेमा येऊ शकतो. यावेळी तुझी भूमिका कोणत्या अभिनेत्याने करावी, असा प्रश्न द्रविडला विचारला गेला. या प्रश्नावर द्रविडने सांगितलं की, " माझ्यावर चित्रपट येईल, यावर माझा विश्वास बसत नाही. पण जर माझ्यावर सिनेमा येत असेल तर त्यामध्ये आमिर खानने काम करावं, ही माझी इच्छा आहे. "

Web Title: The actor should work on my biopic - Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.