पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सोडून आयपीएलचा रस्ता धरणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. IPL आधी २६ मार्चपासून पाकिस्तानमधील टी-२० लीगला सुरुवात होत आहे. मध्यपूर्वेतील तणावाच्या परिस्थितीमुळे ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवण्याची वेळ PCB वर आली आहे. त्यात अनेक परदेशी खेळाडू या स्पर्धेतून माघार घेत IPL ला पसंती देत आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणीत भर पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
PSL ला ठेंगा दाखवत परदेशी खेळाडूंची IPL ला पसंती
गेल्या दोन वर्षांपासून PSL आणि IPL दोन्ही स्पर्धा एकाच वेळी सुरु होतात. अनेक परदेशी खेळाडू पाकिस्तानमधील टी-२० लीगमधून माघार घेत IPL मध्ये खेळण्याला पसंती देत आहेत. श्रीलंकेचा दसुन शनाका याने लाहोर कलंदर्स संघाची साथ सोडून आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग झाला. तो सॅम करनच्या बदली खेळाडूच्या रुपात आयपीएल खेळताना दिसणार आहे. याआधी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याने इस्लामाबाद युनाएटेडच्या संघाला अलविदा करत कोलकता नाईट रायडर्ससोबत करारबद्ध झाला होता. तो बांगलादेशच्या मुस्तफिझुर रहमानच्या जागी खेळताना दिसणार आहे.
तालिबानच्या हल्ल्यांनी पाकिस्तानची तंतरली; सुरक्षा कारणास्तव PSL बाबत घेतला मोठा निर्णय
PSL सोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतून माघार घेत आयपीएलला पसंती देणाऱ्या परदेशी खेळाडूंवर मुंबई इंडियन्सच्या त्या खेळाडूप्रमाणेच कारवाई केली जाईल, असे मोहसिन नक्वी यांनी म्हटले आहे. मोहसिन नक्वी म्हणाले आहेत की, जे खेळाडू शेवटच्या क्षणी PSL ला स्पर्धेत दगाबाजी करतील, त्यांच्यावर नियमांनुसार कडक कारवाई केली जाईल. यावेळी त्यांनी गतवर्षी कॉर्बिन बॉशवर केलेल्या बंदीच्या कारवाईचा उल्लेखही केला. गत हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने पेशावर झल्मी संघासोबतचा करार मोडत मुंबई इंडियन्सकडून खेळण्याला पसंती दिली होती. या खेळाडूवर १ वर्षांच्या बंदीची कारवाई PCB नं केली होती.
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या तारखांत बदल करण मुश्किल
नक्वी म्हणाले की, PSL चं वेळापत्रक बदलणं शक्य नव्हतं, कारण वर्षभरात इतर कोणताही मोकळा स्लॉट उपलब्ध नाही. काही खेळाडूंनी लीगमधून माघार घेतली असली तरी अनेक स्टार परदेशी खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. त्यामुळे स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाले, अशी आशाही नक्वींनी व्यक्त केली आहे.