महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ जिंकली अन् मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ५ जेतेपदाच्या विक्रमाशी बरोबरी केली. CSK कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याने प्रत्येक चाहता भावनिक झाला होता. चेन्नईच्या सामन्यांनी व्ह्यूअर्सशीपचे सर्व रेकॉर्ड मोडले. चेन्नईची मॅच ज्याज्या मैदानावर खेळली गेली तेथे प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. धोनीच्या या करिष्म्याचा BCCIलाही फायदा झाला. हाती आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने केवळ जाहिरातीतून १०,१२० कोटी कमावले आहेत.
स्टार स्पोर्ट्सवर आयपीएल सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवले गेले, तर Jio Cinema हा डिजिटल पार्टनर होता. जिओने सर्वांसाठी आयपीएल मोफत ठेवल्याने त्यांच्या ह्युअर्सशीपला मोठा बूस्ट मिळाला. स्टार स्पोर्ट्स व जिओ सिनेमा यांनी जाहिरातीतून ४७०० कोटी कमावले. फ्रँचायझीने १४५० कोटी आणि बीसीसीआयने ४३० कोटी कमावल्याचे वृत्त समोर येतेय. बीसीसीआय, फ्रँचायझी मालक आणि ब्रॉडकास्टर यांच्या जाहिरातींच्या महसुलात थेट ६५ टक्के वाढ झाली आहे.
आयपीएल २०२३ विजेत्या CSKला २० कोटींचे बक्षीस दिले गेले, तर उप विजेत्या गुजरात टायटन्सला १३ कोटी दिले गेले. 
मुंबई इंडियन्स ( तिसरे ) - ७ कोटी
लखनौ सुपर जायंट्स ( चौथे) - ६.५ कोटी
Emerging Player of the tournament: यशस्वी जैस्वाल ( ६२५ धावा) - १० लाख
Orange Cap: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाख
Purple Cap:  मोहम्मद शमी ( २८ विकेट्स) - १० लाख
Most Valuable Player: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाख
Tiago ev electric Super Striker of the Season: ग्लेन मॅक्सवेल - १० लाख
Game Changer of the Season: शुबमन गिल ( ८९० धावा) - १० लाख
Fours of the season - शुबमन गिल ( ८५ चौकार) - १० लाख
Logest six of the season - फॅफ ड्यू प्लेसिस - १० लाख
Catch of the season - राशीद खान - १० लाख
Fair play Awards - दिल्ली कॅपिटल्स - १० लाख