क्रिकेटच्या नियमानुसार रविचंद्रन अश्विन योग्यच!

रविचंद्रन अश्विनने ज्याप्रकारे जोस बटलरला धावबाद केले, त्यावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला. ज्या पद्धतीने अश्विनने बळी घेतला त्याला ‘मांकडिंग’ म्हटले जाते. पण या शब्दाचा शोध घेतला तर याचा संबंध भारताचे माजी दिग्गज विनू मंकड यांच्याशी लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 01:00 IST2019-03-28T01:00:40+5:302019-03-28T01:00:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
According to the rules of cricket, Ravichandran Ashwin is right! | क्रिकेटच्या नियमानुसार रविचंद्रन अश्विन योग्यच!

क्रिकेटच्या नियमानुसार रविचंद्रन अश्विन योग्यच!

- अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)

रविचंद्रन अश्विनने ज्याप्रकारे जोस बटलरला धावबाद केले, त्यावरुन खूप मोठा वाद निर्माण झाला. ज्या पद्धतीने अश्विनने बळी घेतला त्याला ‘मांकडिंग’ म्हटले जाते. पण या शब्दाचा शोध घेतला तर याचा संबंध भारताचे माजी दिग्गज विनू मंकड यांच्याशी लागतो. स्वतंत्र भारताचा १९४७ साली झालेल्या पहिल्या आॅस्टेÑलियन दौऱ्यात मंकड यांनी दोन वेळा असे धावबाद केले होते.
गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वी नॉन स्ट्राइकर फलंदाजाने क्रिझ सोडणे नियमात बसणारे नाही. २०१७ मध्य या नियमात बदल झाला की, गोलंदाज चेंडू टाकण्याच्या अंतिम क्षणी क्रिझबाहेर गेलेल्या नॉन स्ट्राइकरला धावबाद करु शकतो. अश्विनने याच नियमानुसार बटलरला बाद केले. काहींच्या मते ही अखिलाडूवृत्ती आहे. मंकड यांनी ज्यावेळी असे बळी मिळविण्याआधी फलंदाजाला सावध केले होते की, चेंडू टाकण्यापूर्वी क्रिझ सोडू नका. पण अश्विनने असे केले नाही. त्यामुळेच वादाला तोंड फुटले. पण नियमानुसार फलंदाजाला सावध करण्याची गरज नाही.
या प्रकरणावर मोठा वाद होण्यामागे एक कारणही आहे. या प्रकरणाचा रिप्ले पाहिला तर दिसून येते की, बटलर क्रिझबाहेर येताना घाईघाईने पुढे आला नाही. तो सहजपणे पुढे आला होता. पण नियमानुसार हेही मान्य नाही. त्यामुळे नियमानुसार अश्विन चुकीचा ठरत नाही. शिवाय क्रिकेट नियम बनविणाऱ्या एमसीसीनेही प्रतिक्रिया दिली आहे की, अश्विनने जे केले ते योग्य होते आणि जर यावर काही दुसरा निर्णय द्यायचा होता तर तो हक्क तिसºया पंचाकडे होता. मुळात अशा पद्धतीमध्ये बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नसल्याने खिलाडूवृत्तीचा मुद्दाही उपस्थित होत आहे. त्यामुळेच याप्रकरणी टीकाही झाली.

Web Title: According to the rules of cricket, Ravichandran Ashwin is right!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.