Join us

क्रिकेटसह अन्य खेळांवरील बेटिंगला मान्यता द्या; विधी आयोगाची शिफारस

भारतात लवकरच क्रिकेटसह अन्य खेळांवरील बेटिंगला मान्यता मिळाली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको, कारण तशी शिफारस विधी आयोगाने केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 09:00 IST

Open in App
ठळक मुद्देक्रिकेटसह अन्य खेळांवरील बेटिंगला मान्यता देण्यात यावी अशी शिफारस विधी आयोगाने केली आहे.

नवी दिल्ली - भारतात लवकरच क्रिकेटसह अन्य खेळांवरील बेटिंगला मान्यता मिळाली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको, कारण तशी शिफारस विधी आयोगाने केली आहे. क्रिकेटसह अन्य खेळांवरील बेटिंगला मान्यता देण्यात यावी अशी शिफारस विधी आयोगाने केली आहे. बेटिंग अधिकृत करून त्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर कक्षेत आणावे असेही विधी आयोगाचे म्हणणे आहे. याला प्रत्यक्ष कर लावल्यास परदेशी गुंतवणुकही आकर्षित होऊ शकतील. बेटिंगला पूर्णपणे रोखणे ही अशक्यप्राय बाब असून त्याला कायद्याच्या कक्षेत आणणे हाच एक उपाय आहे. कायद्यात बदल करून बेटिंगला टॅक्सच्या कक्षात आणल्यास महसुल जमा केला जाऊ शकतो. संसदेत तसा लॉ मॉडल तयार करण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला देशात मान्यता नसतानाही बेटिंग केली जाते आणि त्याचा आकडा कित्तेक लाख करोडपर्यंत जातो, असे आयोगाने सांगितले. 

टॅग्स :क्रिकेटक्रीडा