Dasun Shanaka spent 30 runs in 3 balls fans accused fixing : मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यात प्रत्येक मॅचमध्ये गोलंदाजांसाठी एक मोठं चॅलेंज निर्माण झाले आहे. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांमध्ये निर्माण झालेली आक्रमकता गोलंदाजाला बऱ्याच वेळा महागात पडते. हा फॉर्मेट आणखी छोटा झाला तर तिथं गोलंदाजासाठी आणखी कसोटी असते. हीच गोष्ट स्टार क्रिकेटरच्या बाबतीत झाली आहे. एका ओव्हरमध्ये नाही तर निम्म्या ओव्हरमध्ये त्याने चक्क ३० धावा खर्च केल्याचे पाहायला मिळाले. हा क्रिकेटर लोकल नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार चेहरा आहे. कोण आहे तो? कोणत्या मॅचमध्ये त्याने ३ चेंडूत ३० धावा खर्च केल्या जाणून घेऊयात सविस्तर
कोण आहे तो गोलंदाज, ज्यानं ३ चेंडूत खर्च केल्या ३० धावा
ज्या गोलंदाजाने फक्त ३ चेंडूत ३० धावा खर्च केल्या तो चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहेश्रीलंकेचा माजी कर्णधार आणि ऑल राउंडर दसुन शनाका. अबु धाबी टी-१० लीगमध्ये तो खेळताना दिसत आहे. ४८ टी-२० सामन्यात श्रीलंकेचे नेतृत्व करणाऱ्या या क्रिकेटरनं टी-१० लीगमध्ये लाजिरवाणी गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
बांगला टायगर्स विरुद्धच्या १० षटकातील सामन्यात ९ व्या षटकात दिल्ली बुल्सकडून शनाका गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने चौकार मारला. त्यानंतर त्याने सलग २ चेंडू नो बॉलच्या रुपात टाकले. या चेंडूवरही सलग दोन चौकार आले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वैध चेंडूवर एक चौकार आणि षटकार आला. निम्म्या षटकात त्याने २४ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुढचे दोन चेंडूही त्याने नो बॉल टाकले ज्यात एक चौकार आला. अशा प्रकारे तीन चेंडूतच त्याने ३० धावा खर्च केल्या.
सोशल मीडियावर रंगली चर्चा