Join us

भारतीय गोलंदाजांमध्ये विजय मिळवून देण्याची क्षमता 

डेव्हिड मलान :  गोलंदाजीत खूप विविधता. लॉर्डसमध्ये भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर मलान याने मंगळवारी बोलतांना सांगितले की, मला वाटते की भारताने शानदार नेतृत्व केले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 05:50 IST

Open in App

लीड्स : शानदार लयीत असलेले भारतीय गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत संघाला कसोटी सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवत असल्याचे मत इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याने व्यक्त केले आहे. दोन्ही संघांमध्ये बुधवारपासून कसोटी सामना सामना सुरू होत आहे.लॉर्डसमध्ये भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर मलान याने मंगळवारी बोलतांना सांगितले की, मला वाटते की भारताने शानदार नेतृत्व केले. 

माझ्या मते विराट कोहली ज्या प्रमाणे काम करतो त्यात तो धैर्य दाखवतो तो सर्वांचे लक्ष वेधुन घेतो. भारताच्या फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीत देखील खुप विविधता आहे. त्यांच्याकडे खुप पर्याय आहे आणि ते शानदार प्रतिस्पर्धी  आहेत.’

मलान पहिल्या तीनमध्ये असेल - रुटमलान याच्याकडे आंतरराष्ट्रीय      क्रिकेट खेळण्याचा मोठा अनुभव आहे. आणि त्याचा समावेश १५ खेळाडूंच्या संघात करण्यात आला आहे. त्याला पहिल्या तीन स्थानांवर संधी          असेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने म्हटले आहे. त्याने अनेकवेळा खुप दबावाचा सामना केला असल्याचेही म्हटले. इंग्लंडच्या सलामीवीरांना आतापर्यंत एकदाही ५० च्यावर सलामी देता आलेली  नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड
Open in App