अब्दुल कादिरचा मुलगा आॅसीकडून खेळण्यास उत्सुक

पाकिस्तानचा महान लेगस्पिनर अब्दुल कादिर याचा मुलगा आॅस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 05:18 AM2018-11-02T05:18:55+5:302018-11-02T05:19:13+5:30

whatsapp join usJoin us
Abdul Qadir's son is eager to play with Esc | अब्दुल कादिरचा मुलगा आॅसीकडून खेळण्यास उत्सुक

अब्दुल कादिरचा मुलगा आॅसीकडून खेळण्यास उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी: पाकिस्तानचा महान लेगस्पिनर अब्दुल कादिर याचा मुलगा आॅस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास उत्सुक आहे. पंतप्रधान एकादशकडून द. आफ्रिकेविरुद्ध तीन गडी बाद करून त्याने राष्ट्रीय संघ निवडीसाठी दावेदारी सादर केली. वडिलांसारखाच उस्मान कादिर हा देखील लेगस्पिनर आहे. सराव सामन्याद्वारे उस्मानने पहिल्यांदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. लेग स्पिन, गुगली आणि टॉप स्पिन गोलंदाजीत हातखंडा असलेला उस्मान अस्थाई व्हिसा घेऊन आॅस्ट्रेलियात राहतो.

आता विशिष्ट प्रतिभा व्हिसा मिळविण्यासाठी तो अर्ज करू शकतो. यामुळे त्याला राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे सोपे जाईल, शिवाय नागरिकत्वदेखील बहाल होऊ शकेल. उस्मानचे स्वप्न साकार झाल्यास तो फवाद अहमद या पाकच्या खेळाडूंशी बरोबरी करेल.
फवाद याने याआधी आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करीत राष्ट्रीय नागरिकत्व मिळविले आहे. २०१३ मध्ये पदार्पण करणारा फवाद पाचवेळा राष्ट्रीय संघात खेळला. (वृत्तसंस्था)

Web Title: Abdul Qadir's son is eager to play with Esc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.