डी' व्हिलियर्सने केला तिरंग्याचा अपमान; भारतीय चाहते भडकले

डी' व्हिलियर्सने तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे आता तो टीकेचा धनी ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:04 IST2018-07-20T14:03:04+5:302018-07-20T14:04:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ab devilliers insulted the trio; Indian fans stirred up | डी' व्हिलियर्सने केला तिरंग्याचा अपमान; भारतीय चाहते भडकले

डी' व्हिलियर्सने केला तिरंग्याचा अपमान; भारतीय चाहते भडकले

ठळक मुद्देडी' व्हिलियर्सने असं नेमकं केलं तरी काय, ते जाणून घ्या.

नवी दिल्ली : एबी डी' व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेचा असला तरी भारतीय चाहत्यांचा तो गळ्यातील ताईत झाला. भारतीय चाहत्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आहे. पण आता याच डी' व्हिलियर्सवर भारतीय चाहते चांगलेच भडकले आहेत. कारण डी' व्हिलियर्सने तिरंग्याचा अपमान केला आहे. त्यामुळे आता तो टीकेचा धनी ठरत आहे. डी' व्हिलियर्सने असं नेमकं केलं तरी काय, ते जाणून घ्या.

क्रिकेटपटूंना जाहिराती मिळत असतात. कोणत्या जाहिराती आपण करायच्या हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. भारतातील पुलेला गोपीचंद, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या काही माजी महान खेळाडूंनी मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करणे जाणीवपूर्वक टाळले होते. पण डी' व्हिलियर्सने मात्र मद्याची एक जाहिरात केली आहे. ही जाहिरात करणे, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. पण या जाहिरातीमध्ये त्याने तिरंग्याचा वापर केला आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याने ही जाहिरात शेअर केली आहे आणि त्यावर त्याने तिरंगा लगावला आहे. आमची वाईन आता दिल्लीतही मिळणार, असं म्हणत त्याने भारताचा झेंडाही तिथे लावला आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय चाहते कमालीचे भडकले आहेत.

Web Title: ab devilliers insulted the trio; Indian fans stirred up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.