Join us

एबी कुठल्यातरी भूमिकेत येईल : कोहली

कोहली सध्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. तीनदा तो भोपळा न फोडताच परतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 06:08 IST

Open in App

नवी दिल्ली : जिवाभावाचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये कोणत्यातरी भूमिकेत संघाशी जुळेल, अशी अपेक्षा विराट कोहलीने बुधवारी व्यक्त केली. डिव्हिलियर्स आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू होता. गेल्या वर्षी तो क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त झाला.

कोहली म्हणाला, ‘मला एबीची नेहमी आठवण येते. त्याच्यासोबत नियमित बोलणे होते. तो आरसीबीच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून असतो. पुढच्या सत्रात कुठल्या तरी भूमिकेत तो संघासोबत असेल अशी अपेक्षा आहे.’

कोहली सध्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. तीनदा तो भोपळा न फोडताच परतला. विराट म्हणाला, ‘माझ्यासोबत आधी कधीही असे झाले नाही. खेळाद्वारे मला जे दाखवायचे होते ते दाखवून दिले. टीकाकारांकडे लक्ष देत नाही. मी लोकांच्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करतो,’

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सविराट कोहली
Open in App