Join us

'Mr. 360' एबी डिव्हिलियर्स नव्या लीगमध्ये दिसणार, 'या' संघाकडून पदार्पण करणार

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आणखी एका ट्वेंटी-20 लीगशी करार केला आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 09:51 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आणखी एका ट्वेंटी-20 लीगशी करार केला आहे. 2019-20 च्या ट्वेंटी-20 हंगामात 'Mr. 360' एबी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळणार आहे. ब्रिस्बन हिट संघाने त्याच्याशी करार केला आहे. 35 वर्षीय एबी लीगच्या दुसऱ्या टप्प्यात ब्रिस्बन हिटच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

ब्रिस्बन हिट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाले की,''एबी डिव्हिलियर्ससोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद होत आहे. जागतिक दर्जाच्या खेळाडूसोबत काम करण्याची संधी रोज मिळत नाही. एबीकडे असलेले कौशल्य संघातील प्रत्येकाच्या फायद्याचे ठरणारे आहे.''

डिव्हिलियर्सने 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2018मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठई त्यानं 44.20च्या सरासरीनं 442 धावा केल्या.

तो म्हणाला,''बिग बॅश लीगमध्ये मला खेळायचे होते. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जी आक्रमकता लागते, ती या लीगमध्ये ठासून भरलेली आहे.''

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सटी-२० क्रिकेट