Join us  

AB de Villiers Retirement: नातं मनाशी, नातं भारताशी! एबी डिव्हिलियर्सनं निवृत्तीच्या घोषणेतंही जिंकलं भारतीयांचं मन

AB de Villiers Retirement: तो एकदा का मैदानात सेट झाला की मग तो स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करायचा. डोळ्यांचं पारणं फेडायचा. खेळ मनं जोडण्याचं काम करतात असं म्हटलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 3:07 PM

Open in App

AB de Villiers Retirement: तो एकदा का मैदानात सेट झाला की मग तो स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू टोलावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यास सुरुवात करायचा. डोळ्यांचं पारणं फेडायचा. खेळ मनं जोडण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. या वाक्याचा प्रत्यय डीव्हिलियर्सच्या रुपात आला. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा पण खऱ्या अर्थानं ग्लोबल असलेल्या डीव्हिलियर्सचा चाहता वर्ग संपूर्ण जगभरात आहे. डीव्हिलियर्सनं आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि मिस्टर ३६० डिग्रीचा अफलातून प्रवास आज थांबला. पण थांबतानाही त्यानं भारताशी असलेलं नातं त्याच्या पोस्ट मधून दाखवून दिलं. 

एबी डीव्हिलियर्सनं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. त्यानं निवृत्ती जाहीर करताना सर्वांचे आभार मानणारी एक सविस्तर पोस्ट लिहिली. पण खरं लक्ष वेधलं ते त्यानं पोस्ट केलेल्या फोटोनं. कारण एबीडी व्हिलियर्सनं निवृत्तीची घोषणा करताना स्वत:चा फोटो शेअर केला. त्यावर त्यानं इंग्रजीत Thank You म्हटलं तसंच त्यानं देवानागिरीत 'धन्यवाद' असंही लिहीलं आहे. त्यामुळे डीव्हिलियर्सनं निवृत्तीच्या घोषणेतूनही भारताबद्दल त्याच्या मनात असलेलं एक वेगळं स्थान दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा भारतीयांचं मन जिंकलं आहे. 

डिव्हिलियर्सची पोस्ट जशीच्या तशी...

आजवरचा प्रवास खरंच खूप भन्नाट होता. पण आता मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 

अगदी घराच्या अंगणात मोठ्या भावासोबत खेळण्यापासून ते आतापर्यंत मी अगदी मनापासून क्रिकेट खेळलो आणि त्याचा आनंद लुटला. आता वयाच्या ३७ व्या वर्षी आधीसारकी ऊर्जा राहिलेली नाही आणि हे सत्य मला स्वीकारलं पाहिजे. हे अगदीच अचानक वाटत असलं तर तसं नाहीय. म्हणून मी आज ही घोषणा करतोय. माझी वेळ आली आहे. 

क्रिकेटनं मला खूप मायेनं जवळ केलं आहे. मग ते टायटन्ससाठी खेळणं असो, द.आफ्रिकेसाठी असो किंवा मग आरसीबीसाठी. जगात कुठेही असो. या खेळानं मला विचारही करू शकणार नाही असे अनुभव आणि संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी मी कायमच ऋणी राहिन. 

मला माझ्या सर्व संघ सहकाऱ्यांचे, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे, प्रत्येक प्रशिक्षकाचे, फिजिओ आणि प्रत्येक स्टाफ मेंबरचे आभार व्यक्त करायचे आहेत. ज्या सर्वांनी माझ्यासोबतचा हा प्रवास अनुभवला आहे. मला द.आफ्रिका आणि भारताबरोबतच जगभरामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलो तिथे मिळालेला पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 

माझ्या कुटुंबाने दिलेल्या बलिदानाशिवाय, तडजोडींशिवाय हे सारं काही शक्य नव्हतं आणि याची मला पूर्ण जाणीव आहे. माझे पालक, भाऊ, पत्नी डॅनिली आणि माझी मुलं. या सर्वांना आता मी प्राधान्य देणार आहे. 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सएबी डिव्हिलियर्स निवृत्तीद. आफ्रिकाआयसीसी
Open in App