आऊट झाला म्हणून अ‍ॅरोन फिंचने खुर्चीवर काढला राग, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई

भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या पाराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघल उत्सुक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 10:55 IST2019-02-19T10:42:46+5:302019-02-19T10:55:28+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Aaron Finch charged with CA Code of Conduct breach | आऊट झाला म्हणून अ‍ॅरोन फिंचने खुर्चीवर काढला राग, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई

आऊट झाला म्हणून अ‍ॅरोन फिंचने खुर्चीवर काढला राग, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कारवाई

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवला. आता या पाराभवाची परतफेड करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ उत्सुक आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिकेला रविवारपासून ट्वेंटी-20 मालिकेनं सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचला कारवाईला सामोरे जावे लागले. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात लेव्हल -1 नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी फिंच दोषी आढळला आहे.

32 वर्षीय फिंचने 2.1.2 च्या कलमांचा उल्लंघन केला आणि त्याने मैदानावरील सामन्यांची तोडफोड केली. बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा कर्णधार फिंचला मेलबर्न स्टार्सविरुद्ध राग आवरता आला नाही. अंतिम सामन्यात तो 13 धावांवर तो धावबाद झाला, परंतु बाद झाल्याचा राग त्याने खुर्चीवर काढला आणि त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला.



त्याच्या या कृत्याची दखल घेत सामनाधिकारी बॉब स्ट्रँटफोर्ड यांनी फिंचला दोषी जाहीर केले. फिंचनेही आपली चूक स्वीकारली. फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना 13 धावांनी जिंकत जेतेपद नावावर केले. 


दरम्यान, भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे केवळ सात सामने आहेत. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील.  

याबाबत फिंच म्हणाला की, " आम्हाला भारतामध्ये येऊन पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. भारताविरुद्धच्या सामन्यात पूर्ण आत्मविश्वाने उतरलो तर विजय आमचाच असेल. त्याचबरोबर आम्ही या दौऱ्यासाठी खास रणनीती आखली आहे. या रणनीतीची योग्य अंमलबजावणी झाली तर भारताचा पराभव निश्चित होऊ शकतो. " 

 

Web Title: Aaron Finch charged with CA Code of Conduct breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.