Join us

आमिरने पळ काढला; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची बोचरी टीका

आमिरच्या निवृत्तीचे मला आश्चर्य वाटते, कारण वयाच्या २७-२८ व्या वर्षीच तुमची खरी परीक्षा असते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन व इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला आमिरची गरज होती असे त्याने सांगितले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 15:38 IST

Open in App

मुंबई:पाकिस्तानचा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त करताना शुक्रवारी (26 जूलै) कसोटीमधून निवृत्ती घोषित केली होती. मात्र या निवृत्तीवर पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटर वसीम अक्रमसहशोएब अख्तरनेही आश्चर्य व्यक्त केले आहे.

वसीमने म्हणटले की, आमिरच्या निवृत्तीचे मला आश्चर्य वाटते, कारण वयाच्या २७-२८ व्या वर्षीच तुमची खरी परीक्षा असते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन व इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला आमिरची गरज होती असे त्याने सांगितले. 

त्याचप्रमाणे शोएब अख्तर म्हणाला की, मोहम्मद आमिरने वयाच्या २७ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. मग, हसन अली व वहाब रियाजचं काय असा प्रश्न उपस्थित केला.      

मोहम्मद आमीरने विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 17 विकेट्स घेत आपला दबदबा दाखवून दिला. पण, संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

अमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30.47 च्या सरासरीने 119 विकेट्स घेतले आहेत. त्याने 2009 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर मात्र 2011 च्या लॉड्स फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण त्यांनतर त्याने 2016 ला पुनरागमन केले. तसेच 2017मध्ये पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2019 ला जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे. 

टॅग्स :पाकिस्तानवसीम अक्रमशोएब अख्तर