Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update : ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली! 

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:07 PM2022-05-12T22:07:19+5:302022-05-12T22:07:40+5:30

whatsapp join usJoin us
Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update: Chasing the target of 98 runs, Mumbai Indians loss 4 wickets in 33 runs; See what happened to owner Akash Ambani! | Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update : ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली! 

Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update : ९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भंबेरी उडाली; बघा मालक आकाश अंबानी यांची अवस्था काय झाली! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 Mumbai Inidans vs Chennai Super Kings Live Update : चेन्नई सुपर किंग्सचा डाव ९७ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबई इंडियन्स सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) ज्या संघाचा कर्णधार आहे तो संघ सहजासहजी हार मानणार नाही. याची प्रचीती पुन्हा आली. मुकेश चौधरी ( Mukesh Choudhary ) व सिमरजीत सिंग ( Simarjeet Singh ) या गोलंदाजांकडून पहिली ७ षटकं टाकून घेताना धोनीने MIची कोंडी केली. मुंबईची अशी अवस्था पाहून मालक आकाश अंबानी ( Aakash Ambani) व त्यांच्या पत्नीची रिअ‌ॅक्शन व्हायरल झाली.  

ऋतुराज गायकवाड ( ७), डेवॉन ( ०) , रॉबिन उथप्पा ( १)  व मोईन अली ( ०) हे चार फलंदाज १७ धावांवर माघारी परतला. डॅनिएल सॅम्स, जसप्रीत बुमराह व रिली मेरेडिथ यांनी आज सुरेख गोलंदाजी केली. कुमार कार्तिकेयनही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. अंबाती रायुडू ( १०), शिवम दुबे ( १०)  व ड्वेन ब्राव्हो ( १२) यांनाही मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी जाळ्यात अडकवले. इशान किशन व ललित यादव यांनी दोन अफलातून झेल टिपले. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) एकटा खिंड लढवताना दिसला. त्याने ३३ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. चेन्नईचा डाव १६ षटकांत ९७ धावांवर गडगडला. डॅनिएल स‌‌ॅम्सने १६ धावांत ३, रिले मेरेडिथने २७ धावांत २ व कुमार कार्तिकेयने २२ धावांत २ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व रमणदीप सिंग यांच्या वाट्याला प्रत्येकी एक विकेट आली. 

रोहित शर्मा व इशान किशन ही जोडीच या धावा करतील असे वाटत असताना मुकेश चौधरीने कमाल केली. इशानला ( ६) माघारी पाठवून MI वर त्याने दडपण निर्माण केले. रोहितने काही सुरेख फटके मारले, परंतु सिमरजीत सिंगने त्यालाही ( १८) बाद करून मुंबईला धक्का दिला. दोन्ही सलामीवीर ३० धावांवर माघारी परतले. तीन धावानंतर मुकेशने आणखी एक धक्का देताना डॅनिएल सॅम्सला LBW केले. पदार्पणवीर त्रिस्ताना स्तुब्स यालाही LBW करून मुकेशने चौथा धक्का दिला. मुकेशने ४ षटकांत २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.    ( पाहा IPL 2022 - MI vs CSK  सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

Web Title: Aakash Ambani IPL 2022 MI vs CSK Live Update: Chasing the target of 98 runs, Mumbai Indians loss 4 wickets in 33 runs; See what happened to owner Akash Ambani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.