भाग 'धोनी' भाग! चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड अन् माहीनं घेतली फिरकी, Video Viral

धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 02:54 PM2024-02-06T14:54:38+5:302024-02-06T15:11:56+5:30

whatsapp join usJoin us
A video of former Team India captain MS Dhoni is going viral on social media | भाग 'धोनी' भाग! चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड अन् माहीनं घेतली फिरकी, Video Viral

भाग 'धोनी' भाग! चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड अन् माहीनं घेतली फिरकी, Video Viral

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. धोनी आता केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. आगामी आयपीएल हंगाम धोनीचा अखेरचा असू शकतो. धोनी सोशल मीडियावर सक्रिय नसला तरी तो प्रसिद्धीच्या झोतात कायम असतो. धोनीच्या नेतृत्वात भारताने आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला अन् तब्बल २८ वर्षांनंतर आयसीसीचा ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांची फिरकी घेताना दिसतो.

धोनीकडे सेल्फीसाठी विनंती करणाऱ्या चाहत्यांची फिरकी घेताना धोनी दिसला. खरं तर झाले असे की, चाहते सेल्फीसाठी धोनीकडे येताच माहीने धावायला सुरूवात केली. मग त्यांनी देखील आपल्या लाडक्या खेळाडूच्या पाठी धाव घेत अखेर सेल्फी घेतली. धोनी आणि चाहत्यांमधील मजेशीर चकमक सर्वांची मने जिंकत आहे. भारताच्या माजी कर्णधाराचे त्याच्या चाहत्यांसोबत असलेले नाते याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

धोनीची लोकप्रियता जगजाहीर आहे. शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने तीनवेळा आयसीसी ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. २००७ मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वन डे विश्वचषक आणि २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 

आयपीएल २०२४ साठी चेन्नईचा संघ -
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्क्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.

Web Title: A video of former Team India captain MS Dhoni is going viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.