Join us

Video : रस्त्याच्या मधोमध Bike ने दिला दगा; मग MS Dhoni ची हालत काय झाली ते बघा

MS Dhoni struggling to start his bike - महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण आजही चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 15:38 IST

Open in App

MS Dhoni struggling to start his bike - महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण आजही चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. माजी कर्णधार मात्र प्रसिद्धीपासून दूर राहतो, तो ना सोशल मीडियावर सक्रिय असतो ना कोणत्याही कार्यक्रमाला जातो. अशा परिस्थितीत धोनीचा फोटो किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या धोनीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीचे मोटर बाईक प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. धोनीकडे अनेक वाहने आहेत, जी तो आलटून पालटून चालवतो. या वाहनांमध्ये काही किरकोळ समस्या असल्यास धोनी स्वत: तो दूर करतो. पण, यावेळी रस्त्याच्या मधोमध धोनीच्या बाईकने दगा दिला अन् मग काय घडले ते पाहा... 

नुकताच एक YouTuber धोनीला भेटण्यासाठी रांचीला पोहोचला होता. हा युट्युबर धोनीला भेटू शकला नसला तरी त्याने माहीला त्याच्या कॅमेरात कैद केले. धोनी त्याच्या बाईकसह त्याच्या फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश करत होता, तेव्हा YouTuber ने त्याचे रेकॉर्डिंग केले. मात्र यादरम्यान फॉर्म हाऊसमध्ये प्रवेश करताच धोनीची बाईक बंद पडली. धोनीने अनेक वेळा किक मारली पण तरीही बाईक सुरू झाली नाही. त्यानंतर धोनीने पायाने धक्का मारत बाईक हळुहळू पुढे नेली.   अखेर धोनीने काही वेळ सतत प्रयत्न करून बाईक सुरू केली. धोनी त्याच्या फॉर्म हाऊसपासून स्टेडियमपर्यंत बाईकवरून सरावासाठी जातो. महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे पण तो २०२३ मध्ये पुनरागमन करणार आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल असे बोलले जात आहे. आयपीएल २०२३ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्सचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. या निर्णयाने धोनीही खूश होता. अशा परिस्थितीत धोनीच्या निवृत्तीनंतर बेन स्टोक्सला संघाचा पुढचा कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसोशल व्हायरलचेन्नई सुपर किंग्सआयपीएल २०२२
Open in App