भारतीय क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा! क्युट फोटोसह शेअर केली 'गूडन्यूज'

खास कॅप्शनसह क्युट फोटो शेअर करत व्यक्त केला 'बाप माणूस' झाल्याचा आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 00:30 IST2025-06-28T00:21:45+5:302025-06-28T00:30:02+5:30

whatsapp join usJoin us
A New Chapter Begins Team India Fast Bowler Mukesh Kumar Became Father Wife Divya Gave Birth To A Baby Boy | भारतीय क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा! क्युट फोटोसह शेअर केली 'गूडन्यूज'

भारतीय क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा! क्युट फोटोसह शेअर केली 'गूडन्यूज'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघातील जलदगती गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) याच्या घरी आनंदी आनंद गडे...असे वातावरण आहे. क्रिकेटरची  पत्नी दिव्या हिने मुलाला जन्म दिला आहे. मुकेश कुमारनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास पोस्ट शेअर करत ही 'गूडन्यूज' शेअर केली आहे. सध्याच्या घडीला तो भारतीय संघाचा भाग नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना दिसला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

खास कॅप्शनसह क्युट फोटो शेअर करत व्यक्त केला 'बाप माणूस' झाल्याचा आनंद 


पत्नी दिव्यानं पहिल्या बाळाला जन्म दिल्याची बातमी शेअर करताना मुकेश कुमारनं भावूक पोस्ट शेअर केली आहे. " चिमुकल्याच्या आगमनासह  नव्या अध्यायाला सुरुवात.. अशा आशयाच्या कॅप्शनसह क्युट फोटो शेअर करत क्रिकेटरनं 'बेबी बॉय' झाल्याचा आनंद व्यक्त केलाय. या फोटोत मुकेश कुमार आणि दिव्या या जोडीनं  नवजात बालकाचा हात हातात घेतल्याचे दिसून येते. 

शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

कार्यक्रमात पहिली भेट, ४ वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न बंधनात अडकली होती मुकेश-दिव्या जोडी

मुकेश कुमार नोव्हेंबर २०२३ मध्ये दिव्या सिंह हिच्यासोबत लग्न बंधनात अडकला होता. मूळचा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवाशी असलेला मुकेश कुमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये पश्चिम बंगालचे प्रतिनिधीत्व करतो. मुकेश आणि दिव्या यांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली होती. दोघांनी चार वर्षें एकमेकांसोबत डेटिंग केल्यावर लग्न उरकत जोडीनं आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली होती. 

टीम इंडियाकडून तिन्ही प्रकारात पदार्पण करणारा गोलंदाज

मुकेश कुमार सध्याच्या घडीला टीम इंडियाचा भाग नसला तरी अल्पावधितच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही प्रकारात पदार्पण केले आहे. ३ कसोटी सामन्यासह ६ वनडे आणि १७ टी-२० सामन्यात तो भारतीय संघाकडून खेळताना दिसला आहे. कसोटीत त्याच्या नावे ७ विकेट्स जमा असून वनडेत ५ तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने २० विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

Web Title: A New Chapter Begins Team India Fast Bowler Mukesh Kumar Became Father Wife Divya Gave Birth To A Baby Boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.