Join us

आमच्या युवा संघाचा हा शानदार विजय

भारताने पुन्हा एकदा दडपणावर मात करीत सामना जिंकला. यामुळे आमच्या मानसिक ताकदीची कल्पना येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 05:39 IST

Open in App

नवी दिल्ली : स्टार विराट कोहली याने भारताच्या इंग्लंडवरील विजयाला युवा संघाचा शानदार विजय असे संबोधले. त्याने युवा खेळाडूंचे धैर्य, विजयाची भूक आणि लवचिकतेची प्रशंसा केली. वैयक्तिक कारणांमुळे मालिकेबाहेर असलेल्या विराटने ट्वीटमध्ये लिहिले, ‘हा आमच्या युवा संघाचा शानदार विजय आहे. सर्व खेळाडूंचे धैर्य, निर्धार आणि विजय मिळविण्याची भूक शानदार होती.’ विराट- अनुष्का यांच्या घरी १५ फेब्रुवारी रोजी मुलाचा जन्म झाला.

भारताने पुन्हा एकदा दडपणावर मात करीत सामना जिंकला. यामुळे आमच्या मानसिक ताकदीची कल्पना येते. आकाश दीपने शानदार स्पेल टाकला. ध्रुव जुरेलने दोन्ही डावांत उत्कृष्ट धावा काढल्या. त्याचे फूटवर्क अचूक होते. पहिल्या डावात कुलदीप यादवसोबतची त्याची भागीदारी निर्णायक ठरली. दुसऱ्या डावात कुलदीपचा स्पेल तितकाच महत्त्वाचा ठरला. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा या सीनियर्सनी भूमिकेला न्याय दिला. शुभमन गिलने फारच संयमी वृत्तीचा परिचय दिला.    - सचिन तेंडुलकर

रांचीत चौथ्या कसोटीत भारताचा शानदार विजय. मालिकादेखील खिशात घातली. सर्व खेळाडू, व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!          - जय शाह, सचिव, बीसीसीआय

जागतिक दर्जाच्या पाच खेळाडूंविना भारत खेळला. नाणेफेकही गमावली. पहिल्या डावात माघारले, तरीही शानदार विजय मिळविला. भारतीय संघ अभिनंदनास पात्र ठरतो. भारताला अनेक शानदार युवा खेळाडू गवसले आहेत.- मायकेल वॉन, माजी कर्णधार, इंग्लंड

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंड