Join us
Daily Top 2Weekly Top 5

९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी

१० फ्रँचायझी संघांनी ७७ खेळाडूंसाठी खर्च केले २१५.४५ कोटी, २९२ खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:05 IST

Open in App

IPL Auction 2026 Unsold Players List With Jalaj Saxena : IPL २०२६ च्या मिनी लिलावात अनेक भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील लिलावातील ही गोष्ट देशांतर्गत क्रिकेटमध्ये जीव तोडून मेहनत घेणाऱ्या क्रिकेटर्सच्या कष्टाच चीज करणारी अशीच आहे. पण काही क्रिकेटर असेही आहेत ज्यांच्या पदरी अनसोल्डचा टॅग लागल्यामुळे निराशा आली. यात आयपीएल लिलावाची यादी जाहीर झाल्यापासून खास गोष्टीमुळे चर्चेत असणाऱ्या चेहऱ्याचाही समावेश आहे. हा क्रिकेटर जळळपास दीड दशकापासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करताना दिसतोय. ४ वर्षात ४ पुरस्कार पटकावल्यावरही टीम इंडियात एन्ट्री न झालेला आणि IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एक सामना खेळलेला या क्रिकेटरला देशांतर्गत क्रिकेटमधील कपिल देवही म्हटलं जाते. इथं जाणून घेऊयात यंदाच्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या क्रिकेटरची अनटोल्ड स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१० फ्रँचायझी संघांनी ७७ खेळाडूंसाठी खर्च केले २१५.४५ कोटी, २९२ खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

संयुक्त अरब अमीरात येथील अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी लिलावात १० फ्रँचायझी संघांनी २१५.४५ कोटी खर्च करत ७७ खेळाडूंवर बोली लावली. यात २९ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. लिलावात २९२ खेळाडूंना अनसोल्डचाा टॅग लागला. यात भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील 'कपिल देव' अशी ओळख निर्माण करणारा अष्टपैलू जलज सक्सेना याचाही समावेश आहे. यंदाच्या लिलावातील तो सर्वात वयस्क खेळाडूही होता. ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथचे तर नावही पुराकरले नाही.

IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!

९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! 

जलज सक्सेना याने २००५ पासून आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी नोंदवली आहे. या पठ्ठ्यानं १५५ प्रथम श्रेणी, १०९ लिस्ट ए आणि ७९ टी २० सामन्यात अनुक्रमे ७२०२, २०५६ आणि ७०९ धावा काढल्या आहेत. या तिन्ही प्रकारात त्याच्या खात्यात ७०५ विकेट्स जमा आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या या क्रिकेटरला लिलावात भाव मिळाला नाही.  देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करुन दाखवणारा हा अष्टपैलू आयपीएलमध्ये एकमेव सामना खेळला आहे . २०२१ च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून खेळताना त्याने फक्त ३ षटके गोलंंदाजी केली. यात २७ धावा खर्च करून तो विकेटलेस राहिला होता.   

IPL 2026 लिलावातील अनसोल्ड खेळाडूंची  यादी

क्रमांकखेळाडूचे नावबेस प्राइसस्थिती
डेवोन कॉनवे₹२ कोटीकॅप्ड
जेक फ्रेझर-मॅकगर्क₹२ कोटीकॅप्ड
गस एटकिंसन₹२ कोटीकॅप्ड
जेमी स्मिथ₹२ कोटीकॅप्ड
गेराल्ड कोएत्झी₹२ कोटीकॅप्ड
मुजीब रहमान₹२ कोटीकॅप्ड
महेश तीक्षना₹२ कोटीकॅप्ड
स्टीव्ह स्मिथ₹२ कोटीकॅप्ड
शॉन अ‍ॅबॉट₹२ कोटीकॅप्ड
१०मायकेल ब्रेझवेल₹२ कोटीकॅप्ड
११डॅरिल मिचेल₹२ कोटीकॅप्ड
१२शाई होप₹२ कोटीकॅप्ड
१३विल्यम ओ’रूर्के₹२ कोटीकॅप्ड
१४टॉम करन₹२ कोटीकॅप्ड
१५डॅनियल लॉरेन्स₹२ कोटीकॅप्ड
१६अल्झारी जोसेफ₹२ कोटीकॅप्ड
१७नवीन-उल-हक₹२ कोटीकॅप्ड
१८लियाम डॉसन₹२ कोटीकॅप्ड
१९रहमानुल्लाह गुरबाज₹१.५ कोटीकॅप्ड
२०स्पेन्सर जॉन्सन₹१.५ कोटीकॅप्ड
२१साकिब महमूद₹१.५ कोटीकॅप्ड
२२उमेश यादव₹१.५ कोटीकॅप्ड
२३रायली मेरेडिथ₹१.५ कोटीकॅप्ड
२४झाय रिचर्डसन₹१.५ कोटीकॅप्ड
२५जेसन बेहरेनडॉर्फ₹१.५ कोटीकॅप्ड
२६बेन सिअर्स₹१.५ कोटीकॅप्ड
२७ब्यू वेबस्टर₹१.२५ कोटीकॅप्ड
२८रोस्टन चेस₹१.२५ कोटीकॅप्ड
२९काइल मेयर्स₹१.२५ कोटीकॅप्ड
३०ओली स्टोन₹१.२५ कोटीकॅप्ड
३१काइल व्हेरिन₹१.२५ कोटीअनकॅप्ड
३२व्हियान मुल्डर₹१ कोटीकॅप्ड
३३जॉनी बेयरस्टो₹१ कोटीकॅप्ड
३४फझलहक फारुकी₹१ कोटीकॅप्ड
३५रीजा हेंड्रिक्स₹१ कोटीकॅप्ड
३६डॅनियल सॅम्स₹१ कोटीकॅप्ड
३७कुसल परेरा₹१ कोटीकॅप्ड
३८मोहम्मद वकार सलामखेल₹१ कोटीकॅप्ड
३९जॉर्ज लिंडे₹१ कोटीकॅप्ड
४०गुलबदीन नायब₹१ कोटीकॅप्ड
४१विल्यम सदरलँड₹१ कोटीकॅप्ड
४२चरिथ असलंका₹१ कोटीकॅप्ड
४३ड्वेन प्रिटोरियस₹१ कोटीकॅप्ड
४४जोशुआ टंग₹१ कोटीकॅप्ड
४५दीपक हुड्डा₹७५ लाखकॅप्ड
४६के. एस. भरत₹७५ लाखकॅप्ड
४७मयंक अग्रवाल₹७५ लाखकॅप्ड
४८सिद्दीकुल्लाह अटल₹७५ लाखकॅप्ड
४९अकीम ऑगस्ट₹७५ लाखकॅप्ड
५०टिम रॉबिन्सन₹७५ लाखकॅप्ड
२९०सारांश जैन₹३० लाखअनकॅप्ड
२९१सूरज संगराजू₹३० लाखअनकॅप्ड
२९२तन्मय अग्रवाल₹३० लाखअनकॅप्ड
English
हिंदी सारांश
Web Title : Jalaj Saxena: Domestic 'Kapil Dev' unsold despite stellar record in IPL Auction.

Web Summary : Despite impressive domestic cricket stats—9966 runs and 705 wickets—Jalaj Saxena remains unsold in the IPL auction. Dubbed the 'Kapil Dev' of domestic cricket, the veteran all-rounder's consistent performance has yet to translate into IPL success, playing only one match so far.
टॅग्स :आयपीएल लिलाव 2026आयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआय