83 World Cup : वर्ल्डकप जिंकण्याचा नव्हता काही भरोसा, या खेळाडूने बुक केलं होतं हनीमूनचं तिकीट

83 World Cup : भारतीय टीममधील खेळाडू वर्ल्ड कपमध्ये विजयाबाबत नाही तर वर्ल्ड कपनंतर काय करायचं याचं प्लॅनिंग करत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 04:31 PM2021-12-25T16:31:24+5:302021-12-25T16:32:32+5:30

whatsapp join usJoin us
83 World Cup: Kris Shrikanth planning honeymoon America expecting exit from WC | 83 World Cup : वर्ल्डकप जिंकण्याचा नव्हता काही भरोसा, या खेळाडूने बुक केलं होतं हनीमूनचं तिकीट

83 World Cup : वर्ल्डकप जिंकण्याचा नव्हता काही भरोसा, या खेळाडूने बुक केलं होतं हनीमूनचं तिकीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट (Indian Cricket Team) टीमने जिंकलेला १९८३ (83 World Cup) मधील पहिला वर्ल्ड कप यावर रणवीर सिंहचा '८३' सिनेमा रिलीज झालाय आणि त्यावेळच्या अनेक गोष्टींची चर्चा केली जात आहे. भारतीय टीमला १९७५ आणि १९७९ वर्ल्ड कपमध्ये वाईट पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे १९८३ मध्ये भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकेल याचं कुणी स्वप्नही पाहिलं नव्हतं. १९७५ वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला एकुलता एक विजय मिळाला होता. १९७९ मध्ये भारताला श्रीलंकेने हरवलं होतं.

१९८३ चा वर्ल्ड कपकडे टीम इंडियाच्या खेळाडूंनी एका ट्रिपप्रमाणेच बघितलं होतं. भारतीय टीममधील खेळाडू वर्ल्ड कपमध्ये विजयाबाबत नाही तर वर्ल्ड कपनंतर काय करायचं याचं प्लॅनिंग करत होते. याबाबतचा कृष्णामचारी श्रीकांतचा (Kris Shrikanth) एक किस्सा फारच प्रचलित आहे. श्रीकांत भारतीय टीमचा जीव होते. कारण ते गंमती-जमती करून टीमवरील दबाव कमी करत होते.

टीम इंडियाचे ओपनिंग फलंदाज श्रीकांत यांचं लग्न वर्ल्ड कपच्या २ महिन्यांआधीच झालं होतं. श्रीकांत त्यावेळी २४ वर्षांचे होते. श्रीकांत यांनाही इतर खेळाडूंप्रमाणे विश्वास होता की, टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकू शकणार नाही. जशी टीम निवडली गेली सर्व खेळाडूंनी वर्ल्ड कपनंतर अमेरिकेला जाण्याचं प्लानिंग केलं होतं.

टीम सिलेक्शननंतर सुनील गावस्करने श्रीकांतला फोन करून सांगितलं होतं की, तू तुझं अमेरिकेचं तिकीट काढ, आपण मधेच इंग्लंडमध्ये वर्ल कप खेळल्यावर सगळेजण अमेरिकेला जाऊ. श्रीकांतने सुनील गावस्करच्या फोननंतर पत्नीलाला सांगितलं की, आपल्याला हनीमूनसाठी अमेरिकेला जायचं आहे आणि पण मधे वर्ल्ड कपसाठी लंडनमध्ये थांबायचं आहे.

टीम इंडियातील खेळाडूंना विश्वास होता की, गेल्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम लीग राऊंडच्या पुढे जाणार नाही. श्रीकांत यांनी गमतीदार अंदाज सांगितलं होतं की, सर्वांचं अमेरिकेला जाण्याचा प्लान कर्णधारन कपिल देवने कॅन्सल केला. 

ज्या दिवशी खेळाडूंना अमेरिकेसाठी फ्लाइट पकडायची होती त्यावेळी टीम इंडिया लॉर्ड्सवर वर्ल्ड कप फायनल खेळत होती. त्या फायनलमध्ये विजय मिळाल्यावर टीम इंडियाला सरळ भारतात यावं लागलं आणि सर्व खेळाडूंचं हार घालून स्वागत करण्यात आलं. 

टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने कुणालाही अमेरिकेला जाता आलं नाही. पण या विजयाने भारतात एका नव्या युगाची सुरूवात झाली. या विजयाने अनेक तरूण खेळाडूंना क्रिकेटर बनण्याची प्रेरणा मिळाली. 
 

Web Title: 83 World Cup: Kris Shrikanth planning honeymoon America expecting exit from WC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.