Join us  

आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 5:04 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार सलामीची लढतआयपीेएलमधील या विक्रमांत ख्रिस गेलचीच जादू

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. IPL 2020चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात IPL 2020वरही अनिश्चिततेचं सावट होतं. पण, BCCIनं सर्व संकटांवर मात करून अखेर 13वे पर्व संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेतला. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. IPL 2020चा पहिला सामना सुरू होण्यासाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे IPLमधील असे 8 विक्रम जाणून घेऊया, जे मोडणे अशक्यच आहेत. (8 IPL records which cannot be broken ) 

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार? 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर... 

Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

1. ख्रिस गेलच्या ( Chris Gayle) एका षटकात 37 धावा ( आयपीएल 2020)युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) हा ट्वेंटी-20 क्रिकेटमधील राजा आहे. जगभरातील अनेक फ्रँचायझी लीगमध्ये त्यानं आपल्या फटकेबाजीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यानं 2011मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ( Royal Challengers Bangalore) प्रतिनिधित्व करताना कोची टस्कर केरळ संघाचा गोलंदाज प्रसंथ परमेश्वरन याच्या एका षटकात 37 धावा चोपल्या होत्या. त्या षटकात चार षटकार व तीन चौकार मारले गेले आणि त्यात एक नो बॉलचाही समावेश होता. हा विक्रम मोडणे अशक्य आहे.

2. चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा  प्रत्येक मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा संघ ( आयपीएल 2020)आतापर्यंत झालेल्या प्रत्येक आयपीएलच्या प्ले ऑफपर्यंत प्रवेश करण्याचा मान महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSKनं केला आहे. मॅच फिक्सिंगमुळे CSKला 2016 व 2017मध्ये बंदी घातली गेली होती.  

3. मोठ्या फरकाचा विजय ( आयपीएल 2020)2017च्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स ( आताची दिल्ली कॅपिटल्स) ला मुंबई इंडियन्सविरुद्ध ( Mumbai Indians) लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. MIच्या 213 धावांचा पाठलाग कताना दिल्लीचा संपूर्ण संघ 13.4 षटकांत 66 धावांवर माघारी परतला. मुंबईनं 146 धावांनी मिळवलेला विजय हा IPL इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.

4. ख्रिस गेल ( Chris Gayle) चे 30 चेंडूंत शतक ( आयपीएल 2020)ख्रिस गेलनं IPLमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला आहे. त्यानं 2013मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध 30 चेंडूंत शतक झळकावताना नाबाद 175 धावांची खेळी केली होती. युसूफ पठाणनं 2010मध्ये 37 चेंडूंत शतक पूर्ण केलं होतं आणि गेलनं तो विक्रम मोडला. गेलनं या खेळीत 17 षटकार खेचले. एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

5. संघाच्या सर्वाधिक धावा  ( आयपीएल 2020)2013मध्ये RCBनं ख्रिस गेल, विराट कोहली आणि एब डी'डिव्हिलियर्स यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. याच सामन्यात RCBने 264 धावांचे लक्ष्य उभे केले. गेलनं 66 चेंडूंत नाबाद 175 धावा केल्या. एबीनं 8 चेंडूंत 31 धावा चोपून काढल्या.

6. सर्वात कमी धावसंख्या  ( आयपीएल 2020)सर्वाधिक धावसंख्येबरोबरच RCBच्या नावावर सर्वात कमी धावांचा विक्रमही आहे. 2017मध्ये त्यांना 50 धावांचा पल्लाही ओलांडता आला नव्हता. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) विरुद्ध त्यांना 49 धावा करता आल्या होत्या.

7. एका पर्वात सर्वाधिक धावांचा विक्रम ( आयपीएल 2020)विराट कोहलीनं ( Virat Kohli)  2016च्या पर्वात सर्वाधिक 973 धावा चोपल्या होत्या. IPLच्या एका पर्वात 900 धावांचा पल्ला ओलांडणारा कोहली हा पहिलाच खेळाडू आहे.

8. विराट-एबीची विक्रमी भागीदारी ( आयपीएल 2020)विराट कोहली आणि एबी डी'व्हिलियर्स यांनी गुजरात लायन्सविरुद्ध 229 धावांची विक्रमी भागीदारी केली होती.  विराटनं 109 आणि एबीनं 129 धावा केल्या होत्या.  

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएलख्रिस गेलचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएबी डिव्हिलियर्सदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्सगुजरात लायन्स