Join us

१६ वर्षांची शेफाली वर्मा आयसीसी क्रमवारीत अव्वल

तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुजी बेट्स हिला मागे टाकले. सुजी बेट्स एका स्थानाने दुसऱ्या स्थानी घसरली. सुजीचे ७५० गुण आहेत, तर शेफाली ७६१ गुणांसह अव्वल आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 03:51 IST

Open in App

सिडनी : टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज १६ वर्षांची शेफाली वर्मा हिने जागतिक टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषेदने (आयसीसी) महिला टी२० क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. शेफालीने तब्बल १९ स्थानांची झेप घेत अव्वल स्थानी कब्जा केला आहे. तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुजी बेट्स हिला मागे टाकले. सुजी बेट्स एका स्थानाने दुसऱ्या स्थानी घसरली. सुजीचे ७५० गुण आहेत, तर शेफाली ७६१ गुणांसह अव्वल आहे.आॅक्टोबर २०१८ पासून सुजी अव्वल स्थानी होती. टी२० विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाला पोहोचण्यात शेफालीचे महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक सामन्यात शेफालीने धडाकेबाज कामगिरी करीत विजय मिळवून दिला. शेफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसºया सामन्यात ३९, तिसºया सामन्यात ४६ आणि चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. दोन सामन्यात ती सर्वोत्तम खेळाडू ठरली होती.त्याचवेळी अनुभवी स्मृती मानधना हिला मात्र दोन स्थानांचा फटका बसला असून ती सहाव्या स्थानी घसरली. भारतीय गोलंदाजांमध्ये पूनम यादव हिला चार स्थानांचा लाभ झाला. ती आठव्या स्थानी आली आहे. श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू ही फलंदाजांमध्ये १८ वरून १४ व्या स्थानी आली. भारताची दीप्ती शर्मा ही नवव्या स्थावरून सातव्या क्रमांकावर दाखल झाली आहे. तिने प्रथमच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान पटकावले. संघाच्या क्रमवारीत आॅस्ट्रेलिया २९० गुणांसह नंबर वन असून दुसºया स्थानी इंग्लंड संघ २७८ गुणांसह कायम आहे. (वृत्तसंस्था)