टीम इंडियानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करून दाखवली. न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करत भारतीय संघानं विक्रमी तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यंदाच्या हंगामात अनेक विक्रम मोडीत निघल्याचे पाहायला मिळाले. इथं नजर टाकुयात यंदाच्या हंगामात मोडीत निघालेल्या अन् नव्याने प्रस्थापित झालेल्या ७ रेकॉर्ड्सवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीनं मोडला सचिनचा सर्वाधिक फिफ्टी प्लसचा रेकॉर्ड
Sachin Tendulkar Virat Kohli
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा नवा विक्रम सेट केला आहे. त्याने या स्पर्धेत ७ वेळा फिफ्टी प्लस धावा केल्या आहेत. याआधी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिन तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ६ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याची नोंद आहे.
कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावांचाही साधला डाव
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीनं आपल्या नावे केला आहे. आतापर्यंत्या इतिहासात कोहलीनं १८ सामन्यात ७४७ धावा केल्या आहे. याआधी हा विक्रम गब्बर शिखर धवनच्या नावे होता. त्याने १० सामन्यात ७०१ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. हा विक्रम किंग कोहलीनं मोडीत काढलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. याबाबतीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल सर्वात टॉपला आहे. त्याने १७ सामन्यात ७९१ धावा केल्यात.
रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सिक्सर किंग
Rohit Sharma
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानंही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खास विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मानं आयसीसी वनडे स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय. वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मिळून रोहितच्या खात्यात ६९ षटकारांची नोंद आहे. याआधी या यादीत ख्रिस गेल६४ षटकारांसह आघाडीवर होता.
संघाच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या नवव्या हंगामात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेमी फायनल लढतीत या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली. न्यूझीलंडच्या संघाने सेमी फायनलच्या सान्यात निर्धारित २० षटकात ३६२ धावा धावफलकावर लावत नवा विक्रम प्रस्थापित केला. याआधी याच हंगामात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाने अनुक्रम ५ बाद ३५६ आणि ८ बाद ३५१ धावसंख्या उभारल्याचे पाहायला मिळाले होते.
सर्वात जलद शतक
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील डेविड मिलरनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम आपल्या नावे केला. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने अवघ्या ६७ चेंडूत शतक साजरे केले. याआधी या स्पर्धेतील जलदग शतकी खेळीचा रेकॉर्ड हा भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (२००२ हंगामात) आणि ऑस्ट्रेलियन जोस इंग्लिस (२०२५ च्या हंगामात) यांच्या नावे होता. दोघांनी ७७ चेंडूत शतक साजरे केले होते.
इब्राहिम झाद्रानचा पराक्रम
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रान याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १४६ चेंडूत १७७ धावांची दमदार खेळी केली. १२ चौकार आणि ६ षटकाराने बहरलेल्या ही खेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने याच हंगामात ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेन डकेट याने सेट केलेला १४३ चेंडूतील १६५ धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडीत काढला.
यंदाच्या हंगामात शतकांची 'बरसात'
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ स्पर्धेत एकूण १४ शतके पाहायला मिळाले. यासह एका हंगामात सर्वाधिक शतकांचा नवा विक्रम सेट झाला. याआधी २०२२ च्या हंगामात सर्वाधिक १० शतके पाहायला मिळाली होती.
Web Title: 7 Records Broken In Champions Trophy 2025 Fastest Century To Highest Score Virat Kohli Rohit Sharma Also In List
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.