नेपाळच्या रुबिना छेत्री बेलबाशीने FairBreak Invitation ट्वेंटी-२० स्पर्धेत पाकिस्तानची साना मिर नेतृत्व करत असलेल्या सॅफिरेस संघाची वाईट अवस्था करून टाकली. लॉरेन विनफिल्ड हिल्स बार्मा आर्मीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रुबिनाने अविश्वसनीय कामगिरी करताना संघाला ६१ धावांनी विजय मिळवून दिला.
रुबिनाने पहिली विकेट एरिन बर्न्सची घेतली. त्यानंतर पाचव्या षटकात तिने कुवेतच्या मरियम ओमारची विकेट घेतली. ११व्या षटकात बॅबेट्टे डी लीडीला बाद केले. हाँग काँगच्या केरी चॅन आणि कर्णधार साना यांची विकेट घेत रुबिनाने पंचक साजरे केले. त्यामुळे १६९ धावांचा पाठलाग करणारा सॅफिरेस संघ १०७ धावांवर ऑल आऊट झाला.